शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

राज्यातील मोठे नेते पिछाडीवर ! काँग्रेससहित भाजपलाही बसू शकतो झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:02 IST

Nagpur Vidhan Sabha Assembly Election Result 2024 winning candidates LIVE Updates: विदर्भातील नेत्यांमध्ये टफ फाईट; राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालात विदर्भाचा निकाल लक्षवेधी ठरणार असं समजल्या जात होत ते राज्याची सत्ता मिळवण्यासाठी पण विदर्भातील निकालाचे वळण पाहता विद्यमान आमदार आणि नेत्यांना मतदारसंघात त्यांची सत्ता ठेवणे कठीण झालं आहे. 

काटोल मतदारसंघातून उभे असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख दहाव्या फेरी अखेर पिछाडीवर आहेत. भाजपाचे चरण सिंग ठाकूर २६९९७ मतांनी पुढे आहेत त्यामुळे अनिल देशमुखांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदार संघातून नाना पटोले यांना दहाव्या फेरीअखेरीस अविनाश ब्राह्मणकर यांनी ४७४ मतांनी मागे टाकले आहे. नऊ फेरी होईस्तोवर नाना पाटोले यांना मोठी आघाडी घेणे शक्य झाले नाही आणि दहाव्या फेरीअखेरीस ब्राह्मणकर यांनी नाना पटोलेंना मागे टाकत काँग्रेस नेत्यांना घाम सोडला आहे.  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी  विधानसभा क्षेत्रात आठव्या फेरी अखेरीस पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे सुरेश भोयर ५८३१ मताने आघाडी घेतली असून ते कायम ठेऊ शकतील का याची उत्सुकता आहे. 

आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या नाना पटोलेना साकोलीमध्ये अविनाश ब्राह्मणकर तगडी टक्कर देत आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुलाला उमेदवारी देत काटोल मध्ये गढ राखण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या वाटेला यश येईल याचे संकेत दिसत नाहीयेत. तसेच भाजपचे प्रमुख नेते चंद्रशेखर बावनकुळे पिछाडीवर असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील धाकधूक आहे. राज्याचे मोठे नेते काटेच्या टक्करीला सामोरे जात आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष सध्या विदर्भातील काटोल, साकोली आणि कामठी विधानसभा मतदार संघात लागलेले आहे. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरsakoli-acसाकोलीkatol-acकाटोलkamthi-acकामठीNana Patoleनाना पटोलेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSalil Deshmukhसलिल देशमुख