भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; दोन ठार, नऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 13:29 IST2021-03-18T13:29:40+5:302021-03-18T13:29:59+5:30
Nagpur News नागपूर-सावनेर महामार्गावर पाटणसावंगी उडाण पुलावर गुरुवारी पहाटे भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात दोन ठार तर ९ जण जखमी झाले आहेत.

भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; दोन ठार, नऊ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-सावनेर महामार्गावर पाटणसावंगी उडाण पुलावर गुरुवारी पहाटे भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात दोन ठार तर ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धनराज बळीराम वानखेडे (७०) रा. पारतलाई ता.मोहखेड जि. छिंदवाडा व शिवराम रामाधार चौरिया (९५) रा.बामला ता.मोहखेड जि.छिंदवाडा अशी मृतांची नावे आहेत.
जखमीमध्ये ट्रॅव्हल्स चालक रवी फुलसिंग मालवीय (३१) रा. पिपला वन देवास, ट्रॅव्हल्स प्रवासी गोलू इकबाल मेवासी (२४), रा. भोपाळ, सलमान सलीम शेख (२३), रा भोपाळ, देवेंद्र शाहू (२३), रा भोपाळ, शबिया फिरोज शेख,(२५) रा मानकापूर नागपूर, रामबाबू फहिरवर, (२९) रा. ओरिसा, आसू रोहिकार (२४) रा. जयताळा, नागपूर, अनुराग प्रेमसिंग यादव (२७) रा. इंदोर, संदीप कुमार मोहन शाहू (२९) रा. ओरिसा यांचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे की, रॉयल महाराजा कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक एम पी ३० पी ०६८२ ही नागपूर मार्गे रायपूर येथे जात होती. याच दरम्यान आयसर ट्रक क्रमांक एम पी २८ जी ६६६६ हा छिंदवाडा येथून लसूनचे कट्टे घेऊन नागपूर भाजी मार्केट मध्ये जात होता. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास पाटणसावंगी उडाण पुलावर भरधाव ट्रॅव्हल्सने आयसर ट्रकवर मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात आयसर ट्रकच्या मागे बसलेले दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ट्रॅव्हल्स ड्रायव्हर सह ८ प्रवासी जखमी झाले. घटने नंतर आयसर ट्रक चालक फरार झाला. समजताच पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. मृत देह सावनेर येथील शवागृहात तर जखमींना मेयो हॉस्पिटल नागपूर येथे पाठविन्यात आले.
या अपघातामुळे उडाण पुलावरील एकतर्फी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी व NHAI च्या चमूने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून मार्ग मोकळा केला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, हेमराज कोल्हे, कृष्णा जुनघरे तपास करीत आहे.