शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नागपुरात प्रथमच रंगणार भारत रंग महोत्सव :अमेरिका, रशियाची नाटके होणार सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 8:18 PM

देशातील सर्वात मोठी नाट्य प्रशिक्षण संस्था ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)’च्या वतीने नागपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात असलेल्या ‘भारत रंग महोत्सवा’च्या एका सत्राचे आयोजन केले जात आहे.

ठळक मुद्देएनएसडीची संपूर्ण चमू नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सर्वात मोठी नाट्य प्रशिक्षण संस्था ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)’च्या वतीने नागपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात असलेल्या ‘भारत रंग महोत्सवा’च्या एका सत्राचे आयोजन केले जात आहे. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव शंकरनगर येथील साई सभागृहात पार पडणार आहे.जगभरात रंगकर्मींमध्ये या महोत्सवाविषयी प्रचंड आकर्षण असते. हा महोत्सव ‘भारंगम’ या नावाने सर्वपरिचित आहे. आयोजनाचे हे २१वे वर्ष असून, यंदा हा महोत्सव ४५ दिवसांचा असणार आहे. त्यातील सात दिवसांचे यजमानपद नागपूरला मिळाले आहे. एनएसडीच्या रेपरटरी गॅ्रण्ट (अनुदान) समितीचे तज्ज्ञ सदस्य म्हणून नेमणूक झालेले डॉ. विनोद इंदूरकर यांच्या प्रयत्नामुळे नागपूरकर रंगकर्मी व रंगरसिकांना या महोत्सवाचा रसास्वाद घेता येणार आहे.९ फेब्रुवारी रोजी उद्घाटन झाल्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत देश-विदेशातील सात नाटके या महोत्सवात सादर होणार आहेत. यात मुंबई येथून ‘एक झुंज वाऱ्याशी’, कोलकाता येथून ‘लहरिर राजहंसो’, अहमदाबाद येथून ‘काला याने अंधेरा’, अमेरिकेतून ‘लाईव्ह न्युक्स’, कोलकाता येथून ‘गीत गोबिंदो’, रशिया येथून ‘ज्द्रिबिना : दी वरिसर वूमन’ आणि पणजी येथून ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकांचा समावेश आहे. या महोत्सवाच्या तयारीसाठी नागपुरात एनएसडीची संपूर्ण चमू दाखल झाली असून, या महोत्सवात दररोज नागपूरकर कलावंतांचेही सादरीकरण असणार आहे.सेट, प्रकाशयोजना नागपूरचीचया महोत्सवासाठी संपूर्ण प्रारूप एनएसडीकडून प्राप्त झाले असून, रंगमंच सजावट, नाटकाची सेट डिजाईन, प्रकाशयोजना आदी सर्व नागपूरकरांच्याच हाती असणार आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय कलावंतांशी स्थानिक कलावंतांचा संवाद हा महत्त्वाचा बिंदू या नाट्यमहोत्सवातून साधला जाणार आहे.अतिशय महत्त्वाची घडामोड - बापू चनाखेकरहा अतिशय महत्त्वाचा योग जुळून आला असून, अत्यंत महत्त्वाची घडामोड या महोत्सवाद्वारे नागपुरात होत असल्याची आर्त भावना ज्येष्ठ रंगकर्मी व आयोजन सदस्यांमध्ये प्रमुख भूमिकेत असलेले बापूकाका उपाख्य अनिल चनाखेकर यांनी व्यक्त केली.नागपूरकर ‘एनएसडीयन’ उत्साहातया महोत्सवाच्या निमित्ताने एनएसडीचे माजी विद्यार्थी असलेले पीयूष धुमकेकर, संगीता टिपले यांना खास व्यवस्थेत सामील करण्यात आले आहेत. सोबतच अन्य नागपूरकर एनएसडीयन्सही या महोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. नेपथ्याची संपूर्ण व्यवस्था स्वप्निल बोहटे व प्रकाशयोजनेची संपूर्ण व्यवस्था किशोर बत्तासे तर अन्य तांत्रिक व्यवस्थेसाठी रूपेश पवार या नागपूरकर युवा रंगकर्मींना जबाबदारी देण्यात आली आहे. एवढा मोठा महोत्सव प्रथमच नागपुरात होत असल्याने हे सर्व रंगकर्मी प्रचंड उत्साहात आहेत.

टॅग्स :Natakनाटकnagpurनागपूर