महावितरण संचालक (प्रकल्प) पदी भालचंद्र खंडाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:23 IST2019-01-16T21:21:59+5:302019-01-16T21:23:24+5:30
महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर भालचंद्र्र खंडाईत यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

महावितरण संचालक (प्रकल्प) पदी भालचंद्र खंडाईत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर भालचंद्र्र खंडाईत यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
भालचंद्र खंडाईत हे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगडी येथील रहिवासी असून त्यांनी तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात २३ ऑगस्ट १९८९ रोजी चंद्र्पूर परिमंडळातील नवरगाव वितरण केंद्रात कनिष्ठ अभियंता म्हणून आपल्या कार्यकाळाला सुरुवात केली.
९ मे २०११ रोजी त्यांची अधीक्षक अभियंता पदावर मुंबई मुख्यालयात बढती झाली. त्यानंतर गणेशखिंड शहर मंडल कार्यालय येथे ते अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. मुंबई मुख्यालयात प्रारंभी मुख्य अभियंता (वितरण) आणि त्यानंतर मुख्य अभियंता (वाणिज्य) या दोन्ही पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. १६ मे २०१७ रोजी त्यांची प्रादेशिक संचालक म्हणून नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात निवड झाली. राज्यात एचव्हीडीएस योजनेचे काम सर्वप्रथम नागपूर विभागात त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाले.