राहुल गांधींविरोधात नागपुरात भाजयुमोचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 22:15 IST2022-11-17T22:14:51+5:302022-11-17T22:15:26+5:30

Nagpur News कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाचा महिला मोर्चा तसेच भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करण्यात आला.

BHAJUM protest against Rahul Gandhi in Nagpur | राहुल गांधींविरोधात नागपुरात भाजयुमोचे आंदोलन

राहुल गांधींविरोधात नागपुरात भाजयुमोचे आंदोलन

नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाचा महिला मोर्चा तसेच भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. त्यांच्याविरोधात महाल येथील टिळक पुतळा येथे आंदोलन करण्यात आले.

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त होत होताच. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास टिळक पुतळ्याजवळ भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी कॉंग्रेस व राहुल गांधींविरोधात घोषणा दिल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा प्रतीकात्मक पुतळादेखील जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, अर्चना डेहनकर, भाजयुमो शहराध्यक्ष पारेंद्र पटले, सचिन करारे, दिपांशू लिंगायत, अमोल तिडके, मनीष मेश्राम इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

ज्याप्रकारे राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे, ती निषेधार्ह बाब आहे. हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा अपमान आहे. दरवेळी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बाळासाहेब ठाकरेंचे वंशज कसे काय जाऊ शकतात, ही आश्चर्याची बाब आहे. हेच आहे का उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व असा सवाल यावेळी वाघ यांनी उपस्थित केला.

Web Title: BHAJUM protest against Rahul Gandhi in Nagpur