शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:15 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन ९ ते ११ मार्चदरम्यान रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात करण्यात आले आहे. या सभेत संघाच्या सरकार्यवाह पदाचीदेखील निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरित आहे. लोकसभा निवडणुकांना अवघे दीड वर्ष बाकी असल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देसंघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ९ मार्चपासूनसरकार्यवाहांची होणार निवडराजकीय वर्तुळाचेदेखील लागले लक्ष

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन ९ ते ११ मार्चदरम्यान रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात करण्यात आले आहे. या सभेत संघाच्या सरकार्यवाह पदाचीदेखील निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरित आहे. लोकसभा निवडणुकांना अवघे दीड वर्ष बाकी असल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. परंतु यात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या सभेत सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. या सभेत रिक्त जागादेखील भरण्यात येतील, तसेच संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर प्रस्ताव संमत करण्यात येतील.२०१२ व २०१५ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. संघातील सूत्रानुसार यावेळी त्यांची सलग चौथ्यांदा फेरनिवड जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु गेल्या तीन वर्षांतील संघाने घेतलेले धोरण आणि संघप्रणित संघटनांचे वाढते प्राबल्य यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येण्याची शक्यता आहे. तुलनेने तरुण असलेले सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सुरेश सोनी,व्ही.भागय्या, कृष्णगोपाल यांच्या नावाचादेखील विचार होण्याची प्रबळ शक्यता वर्तविण्यात येत आहे.सरकार्यवाहांची निवड झाल्यानंतरच संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येते. सरकार्यवाहांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे होते. या पदासाठी आतापर्यंत एकदाही मतदान करण्याची वेळ आलेली नाही. निवड करून सरकार्यवाहांच्या नावाची घोषणा करण्यात येते. यंदादेखील असेच व्हावे असा संघाचा प्रयत्न आहे.सरकार्यवाहच मुख्य प्रशासकसंघाच्या संविधानानुसार संघाचे सर्वोच्च अधिकारी हे सरसंघचालक नाहीत तर सरकार्यवाह हे आहेत. सरसंघचालक हे संघाचे मार्गदर्शक असतात. सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात. संघाचा विस्तार, संघाची विविध कार्य इत्यादींवर सरकार्यवाह यांचे थेट लक्ष असते.

टॅग्स :RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयnagpurनागपूर