शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

पावसाळ्यात सापांपासून सावधान; जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ चार प्रजाती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST

नागपूर : नागपूर जिल्ह्यात आढळणारे साप अनेक असले तरी विषारी साप फक्त चार जातीचे आहेत. मात्र भीतीपोटी आणि अज्ञानामुळे ...

नागपूर : नागपूर जिल्ह्यात आढळणारे साप अनेक असले तरी विषारी साप फक्त चार जातीचे आहेत. मात्र भीतीपोटी आणि अज्ञानामुळे सापांना सरसकट मारले जाते. कायद्यानुसार हा गुन्हा ठरतो.

शहरात आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात साप निघण्याच्या घटना वाढल्या आहेत. बिळ बुजल्याने साप बाहेर पडतात. खाद्यासाठी पाली, बेडकाच्या शोधात घरात येतात. सर्पदंशाच्याही घटना आता वाढत आहेत. सापाच्या दंशावर ‘अँटी स्नेक व्हेनम` हे औषध शासकीय रुग्णालयातच मिळते. रुग्णाला तेथे तातडीने उपचारासाठी न्यायला हवे. अंगणातील घरातील अडगळ दूर करणे, दाराबाहेर शिळे अन्न न टाकणे, रात्री बाहेर पडताना काठी, टॉर्च, बुट किंवा चपला घालूनच बाहेर पडणे या सारख्या बाबींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जात आहे.

...

जिल्ह्यात आढळणारे विषारी साप (चारही फोटोसह)

नाग : चॉकलेट-ब्राऊन रंगाचा असतो. फण्यावर रोमन १० चा आकडा असतो. गव्हाळवर्णी तसेच काळ्या रंगातही असतो. डोम्या नागही म्हणतात.

मण्यार : निशाचर असतो, पहाटेपर्यंत फिरतो. दिवसा शांत असतो. काळा वर्ण व आडवे पट्टे असतात. मानवी वस्तीलगत वावरतो.

घोषण : डोके त्रिकोणी असते. अजगरासारखा दिसतो, काळे ठिबके असतात. डिवचला गेला तर कुकरसारखी शिट्टी मारतो. जहाल विषारी असतो.

फुरसे : डोके त्रिकोणी असते. लांबी दीड फूट असते. नागमोडी, वळणदार एकाच कडेने चालतो.

...

जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप (सिंगल फोटोसह)

धामण : अत्यंत चपळ. पाण्यात, झाडावर आणि जमिनीवर सारखाच वेग. तोंड उंच करून चालतो. जबड्यावर काळ्या रेषा.

नानेटी : याचा आढळ मानवी वस्तीत आणि गवताळ भागात असतो. सर्वत्र आढळते.

धोंड्या (दिवड) : पाण्यात राहतो. सांडपाणी, डबक्यात वावरतो. पावसाळ्यात सहज आढळतो.

कवड्या : विटांचे ढिगारे, कवेलूचे छत, मातीच्या भींतीच्या फटींमध्ये आढळतो. तोंड कवडीसारखे. लालासर्-पिवळे पट्टे असतात.

...

बॉक्स

साप आढळला तर...

- साप दिसताक्षणी घाबरून न जाता तो कुठे जातो, याकडे लक्ष ठेवावे.

- शक्य असल्यास सर्पमित्राच्या सुविधेसाठी फोटो काढून ठेवावा.

- अडगळीचे सामान दूर करावे. साप मारण्याच्या भानगडीत न पडता तातडीने सर्पमित्रला पाचारण करावे.

- सर्पमित्र येईपर्यंत तो डिवचणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

...

बाक्स

साप चावला तर...

- साप चावल्यास तातडीने हृदयाकडे जाणाऱ्या भागावर करकचून रिबिन बांधावी.

- रुग्णाच्या शरीराची हालचाल टाळावी.

- पायाचा भाग खाली व हृदयाचा वर अशा अवस्थेत त्याला ठेवावे.

- कडू, गोड खायला देऊ नये. ब्लेडने कापू नये, किंवा कुणी तोंडाने विष ओढण्याचा प्रयत्न करू नये.

...

सर्पमित्राचा कोट

साप दिसल्यास त्यावर लक्ष ठेवून जवळच्या सर्पमित्रासोबत किंवा वन विभागाकडे संपर्क साधावा. वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ नुसार सापांना कायदेशीर संरक्षण असल्याने त्यांना हानी पोहचवू नये. सर्वच साप विषारी नसतात.

- श्रीकांत उके, सर्पतज्ज्ञ तथा लोहमार्ग पोलीस

...