मे मध्ये मिळेल माेफत धान्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:52+5:302021-04-19T04:07:52+5:30

नागपूर : राज्य शासनाने सरकारी धान्य दुकानातून माेफत धान्य देण्याची घाेषणा केल्यानंतर आदेशाला उशीर झाल्यामुळे अनेक कार्डधारकांना धान्य विकत ...

The benefit of free grain will be available in May | मे मध्ये मिळेल माेफत धान्याचा लाभ

मे मध्ये मिळेल माेफत धान्याचा लाभ

नागपूर : राज्य शासनाने सरकारी धान्य दुकानातून माेफत धान्य देण्याची घाेषणा केल्यानंतर आदेशाला उशीर झाल्यामुळे अनेक कार्डधारकांना धान्य विकत घ्यावे लागले. या लाभार्थ्यांना मे महिन्यातच एप्रिल महिन्याचे धान्याचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना स्थिती स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न केले असता, संपर्क हाेऊ शकला नाही.

माेफत दिले जाणारे धान्य पीओएस मशीनमध्ये अपलाेड केले की नाही, याबाबतही स्थिती स्पष्ट हाेऊ शकली नाही. उल्लेखनीय म्हणजे गेल्या महिन्यात मशीनमध्ये अपलाेडिंगला उशीर लागत असल्याने रेशन कार्डधारकांना अडचणींचा सामना करावा लागला हाेता. दुकाने, व्यवसाय आणि काम बंद पडल्याने हजाराे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागताे आहे. परिस्थिती आणखी ढासळत चालली आहे. अशा परिस्थितीत गरजवंतांना वेळेवर धान्य मिळाले तरच दिलासा मिळू शकेल. यासाठी विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना गंभीरता दाखवावी लागेल. विशेष म्हणजे माेफत धान्याचे वितरण अंत्याेदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना केले जात आहे. ज्या लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्याचे धान्य घेतले नाही ते याच महिन्यात सरकारी धान्य दुकानातून माेफत धान्य घेऊ शकतात.

Web Title: The benefit of free grain will be available in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.