सर्वेत मागे असल्याने कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारली, शिंदे सेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचा खुलासा

By गणेश हुड | Published: April 15, 2024 07:52 PM2024-04-15T19:52:45+5:302024-04-15T19:53:57+5:30

कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारताना  त्यांना समजावण्याची गरज नाही. सेना-भाजप कार्यकर्त्यांना समजावण्यात आले आहे. पक्षाने विकासाला महत्व दिले आहे. पक्षाने राजू पारवे यांना रामटेक मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.

Being behind in the survey, Kripal Tumane was rejected as a candidate, Shinde Sena's Co-Chief Spokesperson Raju Waghmare Disclosure | सर्वेत मागे असल्याने कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारली, शिंदे सेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचा खुलासा

सर्वेत मागे असल्याने कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारली, शिंदे सेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचा खुलासा

 नागपूर :  रामटेक लोकसभा मतदार संघात निवडणूक पूर्व करण्यात आलेल्या सर्वेमध्ये खासदार कृपाल तुमाने मागे होते. यामुळे त्यांना शिवसेनेची उमेदवारी नाकारण्यात आल्याचा खुलासा शिंदे सेनेचे सहमुख्य प्रवक्ते आणि उपनेते डॉ. राजू वाघमारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात केला.

कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारताना  त्यांना समजावण्याची गरज नाही. सेना-भाजप कार्यकर्त्यांना समजावण्यात आले आहे. पक्षाने विकासाला महत्व दिले आहे. पक्षाने राजू पारवे यांना रामटेक मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी महायुती सरकारचा प्रयत्न असून विदर्भात महावियुतीला चांगले दिवस येतील. 

राज्यातही महायुतीचे ४३ ते ४५ खासदार निवडून येतील. असा विश्वास राजू वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी नागपूर दौऱ्यावर आहे. पक्षाच्या उमेदवारासाठी  नरखेड व सावनेर येथे जाहीर प्रचार सभा घेणार असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.
 

Web Title: Being behind in the survey, Kripal Tumane was rejected as a candidate, Shinde Sena's Co-Chief Spokesperson Raju Waghmare Disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.