बी.एड.च्या परीक्षार्थींची वाहतूक पोलिसांकडून अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 00:10 IST2021-03-19T00:08:54+5:302021-03-19T00:10:12+5:30
B.Ed candidates torchered by traffic police राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या बी.एड. प्रथम सेमिस्टर परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या काही परीक्षार्थींच्या वाहनाचे चालान वाहतूक विभागाने कापले.

बी.एड.च्या परीक्षार्थींची वाहतूक पोलिसांकडून अडवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या बी.एड. प्रथम सेमिस्टर परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या काही परीक्षार्थींच्या वाहनाचे चालान वाहतूक विभागाने कापले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दावा केला होता की आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले होते, की परीक्षार्थींचे चालान कापू नये.
गुरुवारी बी.एड. प्रथम सेमिस्टरचे शिल्लक असलेल्या दोन पेपरपैकी एक पेपर झाला. परीक्षेत १७०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दुपारचा पेपर असल्याने परीक्षेसाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी पकडले, कारणही विचारले. विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्र दाखविल्यानंतर त्यांना जाऊ दिले. परंतु काही ठिकाणी पोलिसांनी विद्यार्थ्यांचे ऐकून घेतले नाही. लॉकडाऊनचा हवाला देत विद्यार्थ्यांचे चालान कापले. ज्या विद्यार्थ्यांनी चालान कापले, त्यांनी सरळ परीक्षा विभागाशी संपर्क साधला. परंतु काही फायदा झाला नाही. परीक्षार्थींना चालान भरावे लागले.
यासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे म्हणाले की, बैठकीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विश्वास दिला होता की परीक्षार्थींना कुठलीही अडचण होणार नाही. यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आले होते. तरीसुद्धा चालान करण्यात आले.