तरुणास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:17+5:302021-04-06T04:08:17+5:30
उमरेड : क्षुल्लक कारणावरून दाेघांनी अश्लील शिवीगाळ व वाद घालून तरुणास मारहाण करीत जखमी केले. आराेपीने त्यास जिवे मारण्याची ...

तरुणास मारहाण
उमरेड : क्षुल्लक कारणावरून दाेघांनी अश्लील शिवीगाळ व वाद घालून तरुणास मारहाण करीत जखमी केले. आराेपीने त्यास जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना उमरेड शहरातील इतवारी पेठेत रविवारी (दि.४) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
नीलेश शंकर वारजूरकर (३०, रा. इतवारी पेठ, उमरेड) असे जखमी तरुणाचे नाव असून, प्रकाश वारजूरकर (५२) व चेतन वारजूरकर (२७, दाेन्ही रा. इतवारी पेठ, उमरेड) अशी आराेपींची नावे आहेत. घरासमाेर माेकाट गाय असल्याने तिला हाकलण्यासाठी नीलेशने हातात लाकडी काठी घेतली आणि ‘गाय जास्त मस्तावली’ असे म्हटले. यावरून दाेन्ही आराेपी घराबाहेर आले व ‘तू काेणाला म्हणताेस?’ असे म्हणून अश्लील शिवीगाळ करीत नीलेशशी वाद घातला. अशात आराेपी प्रकाशने लाकडी पाटाने नीलेशच्या डाेक्यावर प्रहार करून त्यास जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला. तपास पाेलीस हवालदार आशिष खाेडे करीत आहेत.