शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पावसाळ्यात सजग राहा, मुख्यालय सोडू नका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:12 AM

पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज यंत्रणेत होणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा देण्याबरोबर सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून ग्राहकांची समस्या समजून तक्रारींचे तात्काळ निवारण करा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत अवगत करून या दिवसात सर्वतोपरी सजग राहा, असे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालकदिलीप घुगल यांनी दिले.

ठळक मुद्देप्रादेशिक संचालक दिलीप घुगल : ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज यंत्रणेत होणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा देण्याबरोबर सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून ग्राहकांची समस्या समजून तक्रारींचे तात्काळ निवारण करा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत अवगत करून या दिवसात सर्वतोपरी सजग राहा, असे निर्देश महावितरणच्यानागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालकदिलीप घुगल यांनी दिले.सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसात समन्वय साधून कंपनीचे हित जपण्यासाठी काम करावे, आपली जबाबदारी योग्यरीत्या पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसेस बजावून त्यांची बदली इतरत्र करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. सध्या पावसाचे व वादळवाऱ्याचे दिवस असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास युद्धपातळीवर सुधार कार्य हाती घेऊन शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरू होण्यासाठी प्रयत्नरत राहा. महसूल वसुली आणि थकबाकी यांचा सविस्तर आढावा घेतानाच वसुली कार्यक्षमता कमी असलेल्या विभागांनी सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.वितरित केलेल्या विजेची वसुली करणे व आपल्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे ही महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दिलेली जबाबदारी झटकून चालणार नाही. अनियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याच्या स्पष्ट सूचना दिलीप घुगल यांनी दिल्या. ग्राहक सेवेत निष्काळजीपणा व कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याआधीच कारवाई करण्यात आली आहे. पण, ही परिस्थिती अशीच पुढे चालत राहिली तर अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची गय करण्यात येणार नाही व त्यांना परिमंडळाबाहेर बदली करण्याचा गर्भीत इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसेच शहरांची वितरण हानी कमी करण्यासाठी वीज चोरी पकडणे, तात्काळ नवीन वीज जोडणी देणे, वीज चोरांवर गुन्हे दाखल करणे व प्रगतीपथावरील कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच त्यास दर्जेदार करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रादेशिक संचालक यांनी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटदार यांचेशी संवाद साधत ग्राहक सेवेसाठी देखभाल व दुरुस्तीच्या कामाच्या निविदेला प्रतिसाद देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर