युपीतून उर्जा घेतलेले बावनकुळे महाराष्ट्र पिंजणार, कार्यकारी अध्यक्षांसाठी ‘बेस’ बनविणार
By योगेश पांडे | Updated: February 12, 2025 22:57 IST2025-02-12T22:56:18+5:302025-02-12T22:57:34+5:30
यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील सोबत राहणार असून दोघेही राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसह संवाद साधणार आहेत. दोघेही राज्यातील ४७ संघटनात्मक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी व विभागीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

युपीतून उर्जा घेतलेले बावनकुळे महाराष्ट्र पिंजणार, कार्यकारी अध्यक्षांसाठी ‘बेस’ बनविणार
नागपूर : उत्तर प्रदेशात विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन परतलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नव्या दमाने कामाला लागले आहे. भाजपाच्या 'संघटन पर्व' अभियानाच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे हे १३,१४,१५ फेब्रुवारी असे तीन दिवसांच्या महाराष्ट्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील सोबत राहणार असून दोघेही राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसह संवाद साधणार आहेत. दोघेही राज्यातील ४७ संघटनात्मक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी व विभागीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.
रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी जाऊन आढावा घेणार आहेत. या निमित्ताने चव्हाण यांचा ‘बेस’देखील ते पक्का करण्यावर भर देणार आहेत. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनादेखील कामाला लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १३ फेब्रुवारी रोजी अकोला येथे हॉटेल सिटी स्पोर्ट्स येथे सकाळी १० वाजता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्याच दिवशी दुपारी ३ नागपूरच्या जगनाडे चौकातील हॉटेल रिजंटा येथे पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सायंकाळी ७ वाजता पश्चिम नागपुरात कृष्ण ग्रीन लॉन कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी नांदेड, छत्रपती संभाजीनगर तर १५ फेब्रुवारी रोजी जळगाव, नाशिक येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.