शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

विलिनीकरणाविरोधात आज बँकांचा राष्ट्रव्यापी संप

By admin | Updated: January 8, 2016 03:38 IST

स्टेट बँकेशी संलग्न पाच बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) ...

पाच लाख कर्मचारी संपावर : बँकिंग व्यवहार ठप्प होणारनागपूर : स्टेट बँकेशी संलग्न पाच बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) ८ जानेवारीला एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. संपानंतर शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे. संपात २६ राष्ट्रीयकृत बँकांमधील ‘एआयबीईए’चे कर्मचारी सहभागी होणार असल्यामुळे बहुतांश बँकांचे व्यवहार ठप्प राहतील. संघटनेच्या सभासदांची संख्या स्टेट बँकेत कमी असल्यामुळे बँकेचे व्यवहार शुक्रवारी सुरू राहण्याची शक्यता आहे. संपात सहकारी आणि ग्रामीण बँका सहभागी होणार नाहीत. स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ पटियाळा, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर या स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या पाच बँकांचे स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. या बँकांवर सेवा शर्ती लागू करणे हे इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या संघटनादरम्यान झालेल्या कराराचे उल्लंघन असल्याचा आरोप ‘एआयबीईए’चे पूर्व महाराष्ट्र विभागाचे महासचिव बीएनजे शर्मा यांनी लोकमतशी बोलताना केला. संपात ‘एआयबीईए’चे ५ लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याचे शर्मा म्हणाले. शर्मा यांनी सांगितले की, स्टेट बँकेत लागू असलेली ‘करिअर प्रोग्रेसिव्ह स्कीम’ संलग्न बँकांमध्ये लागू करण्यास इंडियन बँक्स असोसिएशन आग्रही आहे. या योजनेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास जास्त आहेत. याशिवाय या बँकांमध्ये सरकारच्या आदेशानंतरही नवीन आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती बंद आहे. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्याचा बँकेच्या व्यवस्थापनाने कट रचला आहे. यापूर्वी संघटनेने ४ जून २०१५ रोजी संप पुकारला होता. तसेच १ व २ डिसेंबरला पुकारलेला संप चर्चेनंतर परत घेण्यात आला होता. (प्रतिनिधी)बँकांचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प होणारराष्ट्रीयकृत २६ बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने नागपुरात कोट्यवधींचे बँकिंग व्यवहार ठप्प राहतील. त्यामुळे ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. स्टेट बँकेसमोर आज निदर्शनेसंपादरम्यान ८ रोजी सकाळी ११ वाजता किंग्जवे येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. गुरुवारी सायंकाळी सेंट्रल एव्हेन्यू येथील स्टेट बँक आॅफ त्रावणकोर बँकेसमोर निदर्शने करण्यात आली.