लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या अटकेचा निषेध करत सोशल मिडियावर आपला तीव्र रोष व्यक्त केला आहे. फेसबुकवरील आपल्या वॉलवर त्यांनी, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नागपूरात असलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर जनतेच्या प्रश्नांवर निदर्शने करणार म्हणून प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो. असे म्हटले आहे.बाळासाहेब थोरात यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून, मुख्यमंत्र् यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवा, विरोधाला घाबरणारे सरकार अशा नोंदी टाकल्या आहेत.
बाळासाहेब थोरात यांनी सोशल मिडियावर केला लोंढे यांच्या अटकेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 11:23 IST