कर्जमाफीचे बोललोच नाही असे सतत म्हणणाऱ्या सरकारला आम्ही निश्चित तारखेवर आणून ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 06:39 IST2025-11-01T06:39:12+5:302025-11-01T06:39:12+5:30
आंदोलनाचा विजय झाल्याचा कडू यांचा दावा

कर्जमाफीचे बोललोच नाही असे सतत म्हणणाऱ्या सरकारला आम्ही निश्चित तारखेवर आणून ठेवले
नागपूर : जे सरकार कर्जमाफीच्या तारखेपासून पळत होते ते सरकार आता तारखेवर आणून ठेवले. यावर आम्ही वॉच ठेवणार. यात कट कारस्थान झाले तर कुणालाही सोडणार नाही, असा इशारा प्रहारचे नेते माजी आ. बच्चू कडू यांनी दिला. कर्जमाफीबाबत गुरुवारी रात्री सरकारशी चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांच्यासह माजी आ. वामनराव चटप, रविकांत तुपकर आदी शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ नागपुरात परतले.
आंदोलन काळात सामान्य नागरिकांना त्रास झाला त्यांची माफी मागतो. समस्या निर्माण करणारे आंदोलन सुरू ठेवणार नाही, अशी ग्वाही शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. अशी महिती प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी दिली.
दगाफटका झाल्यास...
हा आंदोलनाचा विजयच आहे. दगाफटका झाला तर बच्च कडू फाशीवर जाईल. कर्जमाफीचा हप्ता बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. मेंढपाळ, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदी विषयांवर चर्चा राहिली आहे. त्यासाठी आठ दिवसांत पुन्हा बैठक होणार आहे, असेही कडू यांनी स्पष्ट केले.