काचूरवाही येथे बाबा जुमदेवजी जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:26+5:302021-04-04T04:08:26+5:30
रामटेक : मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्यावतीने काचूरवाही (ता. रामटेक) ...

काचूरवाही येथे बाबा जुमदेवजी जयंती
रामटेक : मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्यावतीने काचूरवाही (ता. रामटेक) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
हा कार्यक्रम परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे काचूरवाही शाखा अध्यक्ष अंकुश गोल्हर यांच्या घरी पार पडला. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष लहू बावनकुळे, सचिव गजानन भलमे, प्रमोद गोल्हर, रमेश साकोरे, मुकुंद सोमनाथे, राकेश मोहनकार, शुभम कामळे, प्रल्हाद मोहनकार यांच्यासह सेवक उपस्थित हाेते. यावेळी अनेकांनी त्यांच्या भाषणातून बाबा जुमदेवजी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमादरम्यान काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्यात आले हाेते.