बाबा जुमदेवजी जन्मशताब्दी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:32+5:302021-04-04T04:08:32+5:30
हिंगणा : मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने नीलडाेह (ता. हिंगणा) येथे ...

बाबा जुमदेवजी जन्मशताब्दी उत्सव
हिंगणा : मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने नीलडाेह (ता. हिंगणा) येथे जन्मशताब्दी उत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या उत्सवात हिंगणा तालुक्यातील नीलडोह, अमरनगर, महाजनवाडी, श्रमिकनगर येथील परमात्मा एक सेवक मंडळातील सेव व सेविका सहभागी झाल्या हाेत्या. या कार्यक्रमात काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करण्यात आले हाेते. सेवक व सेविकांना महाप्रसाद, मास्क व लाडूचे वितरण करण्यात आले. यावेळी कृष्णा येलुरे, राजेश बत्तीवाले, सचिन येलुरे, शंकर पंचाळे, लखन नागपुरे, किशोर क्षीरसागर, लक्ष्मण निंबुळकर, विजय चौधरी, राजेश लाखे, चौधरी, तुषार लाडे, श्रीकृष्ण मेश्राम, बिसेन मेश्राम, गिरधारी चौरागडे यांच्यासह सेवक, सेविकांनी हजेरी लावली हाेती.