किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार : अतुल लोंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 18:45 IST2021-11-03T15:34:56+5:302021-11-03T18:45:07+5:30

किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करत असतात. वाहिन्यांवर येऊन तद्दन खोटं बोलतात, असले आरोप खपवून घेतले जाणार नसून त्यांच्या बेताल वक्तव्याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे अतुल लोंढे म्हणाले.

atul londhe on kirit somaiya on nagpur | किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार : अतुल लोंढे

किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार : अतुल लोंढे

ठळक मुद्देमानहानीचा दावा करणार

नागपूर : किरीट सोमय्या हे सातत्याने आरोप करतात, वाहिन्यांवर येऊन तद्दन खोटं बोलतात, हे सर्व खपवून घेतले जाणार नसून त्यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत  बोलत होते.

किरीट सोमय्यांनी काल एका खासगी वाहिनीवरील चर्चेदरम्यान राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम शिवसेनेला, ४० टक्के राष्ट्रवादीला, तर २० टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप केला असल्याचे  लोंढे यांनी सांगितले. केलेल्या आरोपाचे त्यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी असेही लोंढे म्हणाले. 

सतत खोटे आरोप करून सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. अशाप्रकारे खोटेनाटे आरोप करणं खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही लोंढे यांनी दिला. त्यांच्या बिनबुडाच्या आरोपांविरोधात कोर्टात सिव्हील आणि क्रिमीनल याचिका दाखल करणार असल्याचेही लोंढे यावेळी म्हणाले.

Web Title: atul londhe on kirit somaiya on nagpur