नागपुरात मानवी साखळीद्वारे वेधले ज्वलंत समस्यांकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:27 IST2020-02-15T00:25:44+5:302020-02-15T00:27:15+5:30
‘वुई दी पीपल ऑफ इंडिया’ या बॅनर अंतर्गत शुक्रवारी दुपारी २ वाजता शहरातील वेगवेगळ्या भागात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

नागपुरात मानवी साखळीद्वारे वेधले ज्वलंत समस्यांकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘वुई दी पीपल ऑफ इंडिया’ या बॅनर अंतर्गत शुक्रवारी दुपारी २ वाजता शहरातील वेगवेगळ्या भागात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यादरम्यान केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा शांतीपूर्वक निषेध करण्यात आला. तसेच देशातील ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
देशातील अनियंत्रित महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, भूकबळी, आर्थिक मंदी, मानव तस्करी, विद्यार्थ्यांवरील अत्याचार, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण, आरोग्य व शिक्षणाची दयनीय अवस्था, शासकीय एजन्सीचा दुरुपयोग, बाल मजुरी आदी ज्वलंत समस्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. शहरातील अमरावती रोड, संविधान चौक, व्हेरायची चौक, सक्करदरा, पारडी, गड्डीगोदाम, नुरी कॉलनी, कामठी रोड आदी परिसरात ही मानवी साखळी करण्यात आली. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांनी बलात्कार व महिलांवरील अत्याचार रोखण्याची मागणी यावेळी केली.