शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

नागपूरचे ऑक्सिजन टँकर्स गुजरातला नेण्याचा प्रयत्न उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 06:31 IST

सतर्कतेमुळे चारही टँकर नागपूरला रवाना

ठळक मुद्देखान यांनी तातडीने आपली मॅकेनिकची चमू सांगितलेल्या जागेवर पाठवली. परंतु तिथे टँकर नव्हते. प्यारे खान यांनी ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला.

नागपूर : राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नागपूर पहिल्या पाचमध्ये आहे. जिल्ह्यात ६४ हजारांवर कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १३ हजारांवर रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांना ऑक्सिजन दिला जात असल्याने तुटवडा पडू नये यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. अशा परिस्थितीत नागपुरात येत असलेले ऑक्सिजन टँकर्स गुजरातला पळवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्यारे खान यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला आहे. 

नागपूरला ऑक्सिजनचा पुरवठा भिलाई प्लँटमधून केला जात आहे. साधारण १९ टँकरमधून हे लिक्वीड ऑक्सिजनची वाहतूक केली जाते. वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी हाशमी  रोड कॅरिअर प्रा. लि.चे संचालक प्यारे खान यांना देण्यात आली आहे. त्यांना भिलाई येथून ऑक्सिजन भरलेले टँकर नागपूरला पोहचण्यास उशीर होत असल्याचे लक्षात आले. प्यारे खान यांनी तातडीने टँकर चालकाला फोन लावून याची माहिती घेतली. चालकाने टँकरचे ब्रेक डाऊन झाल्याचे सांगितले. 

खान यांनी तातडीने आपली मॅकेनिकची चमू सांगितलेल्या जागेवर पाठवली. परंतु तिथे टँकर नव्हते. प्यारे खान यांनी ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी आधी टाळाटाळ केली आणि नंतर उत्तरे देणेच बंद केले. यावरून टँकर पळवून नेत असल्याची बाब प्यारे खान यांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिली.  हे चारही टँकर्स गुजरातमधील अहमदाबादच्या दिशेने निघाले होते. चारपैकी दोन टँकर्स औरंगाबादजवळ पोहोचले होते. तर इतर दोन टँकरही त्याच दिशेने निघाले होते. मात्र, खान यांनी आपली सूत्रे हलवून चारही टँकर्स नागपूरच्या दिशेने वळवायला लावले. यापैकी दोन टँकर्स नागपूरला पोहोचले असून उर्वरित दोन टँकर्स रात्री उशिरा नागपुरात पोहचले. प्यारे खान यांनी स्वत:च्या पैशातून ऑक्सिजनचे दोन टँकर दिले असून त्याच्या वाहतुकीसाठी ५० लाख रुपयांचीही मदत केली आहे. 

पैशाच्या हव्यासापोटी परस्पर पाठविण्याचा प्रयत्नगुजरातमधून ऑक्सिजन पुरवठादार कंपनीला अधिकची रक्कम मिळत असल्याने जादा पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी चारही टँकर्स परस्पर अहमदाबादला पाठवण्याचा निर्णय घेतला. परंतु आम्ही प्रत्येक ऑक्सिजन टँकरवर नजर ठेवत असल्याने टँकर पळविण्याचा प्रयत्न उधळून लावला.     - प्यारे खान, संचालक, हाशमी रोड कॅरिअर प्रा. लि.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरMumbaiमुंबई