नागपुरात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : आरोपीला जमावाने बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 21:06 IST2018-01-11T21:05:11+5:302018-01-11T21:06:05+5:30
तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुधीर बाबूराम त्यागी (वय ३५, रा. चांदमारीनगर, वाठोडा) याला संतप्त जमावाने बदडले. त्यानंतर त्याला नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी सायंकाळी कोहिनूर लॉन, नंदनवनजवळ ही घटना घडली.

नागपुरात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : आरोपीला जमावाने बदडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुधीर बाबूराम त्यागी (वय ३५, रा. चांदमारीनगर, वाठोडा) याला संतप्त जमावाने बदडले. त्यानंतर त्याला नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी सायंकाळी कोहिनूर लॉन, नंदनवनजवळ ही घटना घडली.
पीडित तरुणी (वय १९) खासगी काम करते. ती नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता ती कामावरून घराकडे परत येत होती. आरोपी सुधीरने तिला अश्लील हातवारे करीत तिचा पाठलाग सुरू केला. त्याचे कुलुषित मनसुबे लक्षात आल्यामुळे तरुणी सुरक्षित ठिकाणी लवकर जाता यावे म्हणून पळू लागली. आरोपीने तिचा धावतच पाठलाग केला. ते पाहून तरुणी आरडाओरड करू लागली. ते ऐकून आजुबाजुची मंडळी धावली. त्यांनी आरोपी सुधीरला पकडले आणि त्याला बेदम चोप दिला. एकाने नंदनवन पोलिसांना बोलविले. नंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. कोहीनूर लॉन ते संघर्षनगर चौक रिंग रोड परिसरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ संतापजनक वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपी सुधीर त्यागीला अटक केली.