शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

नागपुरात मायलेकीची हत्या करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 8:49 PM

मायलेकींना मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांची हत्या करण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला मात्र तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. आरोपीला संतप्त जमावाने घटनास्थळीच पकडून बेदम चोप दिला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी २ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.

ठळक मुद्देगळ्यात फास टाकून आवळलाआई अत्यवस्थ, मुलगी धोक्याबाहेरआरोपीची जमावाकडून धुलाई,अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मायलेकींना मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांची हत्या करण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला मात्र तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. आरोपीला संतप्त जमावाने घटनास्थळीच पकडून बेदम चोप दिला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी २ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.यादवनगराच्या जयभीम चौकाजवळ प्रमिला श्रीचंद विश्वकर्मा (वय ५९) यांचे निवासस्थान आहे. त्या, मुलगी कविता (वय अंदाजे ३५) आणि मुलगा अजय विश्वकर्मा तेथे राहतात. प्रमिला यांची बहीण जरीपटक्यात राहते. तिचा मुलगा आरोपी अविनाश मालवीय याला प्रमिला यांनी काही महिन्यांपूर्वी ४ लाख रुपये उधार दिले होते. ते परत मिळावे म्हणून प्रमिला यांनी अविनाशच्या मागे तगादा लावला होता. तो रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. प्रमिलाने काही दिवसांपूर्वी त्याला चांगलेच खडसावले. त्यावेळी त्याने शनिवारी ७ जुलैला रक्कम परत देतो,असे सांगितले. त्यानुसार, शनिवारी दुपारी २ च्या सुमारास तो मावशी प्रमिला यांच्या घरी आला. यावेळी त्या घरात एकट्याच होत्या. त्याला पहाताच प्रमिला यांनी पैशाची मागणी केली. त्याने टेरेसवर चल हिशेब करू असे म्हणत प्रमिलांना घराच्या टेरेसवर नेले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यात केबलच्या वायरचा फास टाकून करकचून आवळला. बेशुद्ध पडल्यामुळे प्रमिला ठार झाल्या असे समजून आरोपी खाली आला. त्यावेळी त्याला कविता घरात दिसली. तुझी आई बेशुद्ध पडली आहे, पाणी घे असे म्हणत त्याने तिलाही वर नेले. तेथे कविताला मारहाण करून आरोपीने तिच्या गळ्यात फास टाकून आवळला. प्रमिलाने जोरदार प्रतिकार करून त्याच्या पोटात लाथ मारली आणि फास काढून टेरेसवरून शेजाऱ्यांना मदतीसाठी आवाज देत खाली पळ काढला. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी आरोपी अविनाशला पकडून त्याची बेदम धुलाई केली.गंभीर अवस्थेत प्रमिला आणि कविताला खासगी रुग्णालयात दाखल केले. वृत्तलिहिस्तोवर यशोधरानगर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी गुड्डू उर्फ अविनाश घनश्याम मालवीय हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही जरीपटका आणि कोराडी ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समजते. मावशीच्या हत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने ‘तुम्ही घर विकणार आहात. माझ्याकडे ग्राहक असून मला घर दाखवा, असे म्हणत घराच्या टेरेसवर नेल्याचे पोलीस सांगतात. मायलेकीच्या हत्येचा प्रयत्न झाल्याने यादवनगरात खळबळ उडाली आहे. पाच महिन्यांपूर्वी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैश्याच्या वादातूनच गणेश शाहू नामक आरोपीने उषा कांबळे या महिलेला घराच्या पहिल्या माळळ्यावर नेऊन त्यांची तसेच त्यांच्या चिमुकल्या नातीची निर्घृण हत्या केली होती. यशोधरानगरातील आजच्या घटनेने कांबळे दुहेरी हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेला आल्या आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिला