नाश्त्याचे पैसे मागितल्याने केला चाकूने हल्ला, आरोपीस अटक

By दयानंद पाईकराव | Updated: June 24, 2023 17:21 IST2023-06-24T17:21:27+5:302023-06-24T17:21:55+5:30

नागपूर : नाश्ता व चहाचे पैसे मागितल्यामुळे ई रिक्षा चालकाने चाकुने हल्ला करून नाश्त्याचा ठेला चालविणाऱ्या व्यक्तीला जखमी केले. ...

Attacked with a knife after asking for breakfast money, accused arrested | नाश्त्याचे पैसे मागितल्याने केला चाकूने हल्ला, आरोपीस अटक

नाश्त्याचे पैसे मागितल्याने केला चाकूने हल्ला, आरोपीस अटक

नागपूर : नाश्ता व चहाचे पैसे मागितल्यामुळे ई रिक्षा चालकाने चाकुने हल्ला करून नाश्त्याचा ठेला चालविणाऱ्या व्यक्तीला जखमी केले. ही घटना सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वसंत मेडिकल स्टोअर्ससमोर शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सचिन पुरुषोत्तम मंडलवार (वय ३८, रा. लेंड्रा पार्क, रामदासपेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रेमनारायण राममूर्ती शुक्ला यांचा चहा व नाश्त्याचा ठेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री आरोपी सचिन ई रिक्षाने तेथे आला. त्याने प्रेमनारायणच्या ठेल्यावर नाश्ता करून चहा घेतला. त्यानंतर आरोपी पैसे न देताच जाऊ लागला. त्यावर प्रेमनारायणने त्याला पैशाची मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपी सचिनने ई रिक्षातून चाकु काढून प्रेमनारायणच्या पोटावर, खांद्यावर, हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले.

घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेला. जखमी प्रेमनारायणला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रेमनारायणचा मोठा भाऊ अमित राममुर्ती शुक्ला (वय ३२, रा. रामदासपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Attacked with a knife after asking for breakfast money, accused arrested