चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, पोटात चाकू सोडून पळाला

By योगेश पांडे | Updated: October 30, 2023 17:15 IST2023-10-30T17:14:55+5:302023-10-30T17:15:04+5:30

रविवारी सायंकाळी स्नेहाशी वाद घातला व संतापाच्या भरात तिच्यावर चाकूने वार केले.

Attacked his wife on suspicion of character, left a knife in her stomach and ran away | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, पोटात चाकू सोडून पळाला

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, पोटात चाकू सोडून पळाला

नागपूर : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून बेरोजगार पतीने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला व चाकूने वार केले. त्याची आई व शेजाऱ्यांनी आरडाओरड केल्याने तो तिच्या पोटातच चाकू सोडून पळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

स्नेहा मनिष मेश्राम (३७, विलास नगर, जुना बाबुळखेडा, वसंतनगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. ती एका पॅथेलॉजी लॅबमध्ये काम करते. तिचे मनिष मेश्राम याच्याशी २०११ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहेत. मनिष वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून अनेकदा वाददेखील झाले होते.

रविवारी सायंकाळी त्याने स्नेहाशी वाद घातला व संतापाच्या भरात तिच्यावर चाकूने वार केले. त्याचवेळी त्याची आई व शेजारची मुलगी तेथे पोहोचली. त्यांनी आरडाओरड केल्याने स्नेहाच्या पोटात चाकू तसाच ठेवून तो फरार झाला. तिला तातडीने मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची बहीण पायल उके हिच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात मनिषविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Attacked his wife on suspicion of character, left a knife in her stomach and ran away

टॅग्स :nagpurनागपूर