शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

By admin | Updated: November 13, 2014 00:56 IST

दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीमुळे चिडलेल्या नागरिकांच्या जमावाने बुधवारी या वृत्तपत्राच्या स्थानिक कार्यालयावर हल्ला केला. रात्री ८.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे काही

एका बातमीच्या विरोधात केली तोडफोड नागपूर : दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीमुळे चिडलेल्या नागरिकांच्या जमावाने बुधवारी या वृत्तपत्राच्या स्थानिक कार्यालयावर हल्ला केला. रात्री ८.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त हल्लेखोरांनी पोलिसांनाही मारहाण केली. हल्ला करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी घटनास्थळीच पकडले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी दैनिक भास्कर या वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीच्या विरोधात रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास जरीपटका मार्टीननगर येथील २० ते २५ लोकांचा जमाव वृत्तपत्र समूहाच्या ग्रेट नाग रोड येथील कार्यालयावर धडकला. ते नारेबाजी करीत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. कार्यालयाच्या मुख्य दारावर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवित दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिक अधिकच संतप्त झाले. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दगडफेक करीत दरवाजा उघडला. काही हल्लेखोर सुरक्षा भिंतीवरून उडी घेऊन आत आले. हल्लेखोरांनी सर्वात अगोदर कार्यालयासमोर असलेल्या वाहनांना आपले लक्ष्य बनविले. तीन कार आणि एक डझनभर दुचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर हल्लेखोर तळ मजल्यावर आले. तिथेही तोडफोड केली. तेथून पहिल्या माळ्यावर आले. तिथे उपस्थित पत्रकार व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. उग्र रूप पाहून कार्यालयात उपस्थित काही कर्मचाऱ्यांंनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. यात पत्रकारांचे मोबाईल आणि इतर वस्तूंचीही तोडफोड केली. यात सात-आठ कर्मचारी जखमी झाले. पहिल्या माळ्यावर तोडफोड केल्यानंतर हल्लेखोर दुसऱ्या माळ्यावर आले. तिथेही तोडफोड केली. इमामवाडा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याचे समजताच हल्लेखोर पळू लागले. पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे आणखीनच संतप्त झालेले हल्लेखोर पोलिसांना मारहाण करू लागले. पोलिसांनी बळाचा वापर करून पाच जणांना पकडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त के.के. पाठक, संयुक्त पोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्टने या हल्ल्याचा निषेध केला आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी हल्लेखोरांना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)