एटीएसने नागपूरमध्ये दोन संशयित पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:42 IST2019-01-26T04:42:29+5:302019-01-26T04:42:35+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वेसंध्येला बिहारमधून आलेल्या दोन सशस्त्र संशयितांना येथील रेल्वेस्थानक परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडले.

 ATS has arrested two suspects in Nagpur | एटीएसने नागपूरमध्ये दोन संशयित पकडले

एटीएसने नागपूरमध्ये दोन संशयित पकडले

नागपूर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वेसंध्येला बिहारमधून आलेल्या दोन सशस्त्र संशयितांना येथील रेल्वेस्थानक परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडे पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतूस सापडले. दोघांकडे सांकेतिक शब्दातील (कोडवर्ड) एक चिठ्ठीही एटीएसच्या पथकाला मिळाल्याचे समजते. पकडण्यात आलेल्या दोघांची नावे कळू शकली नाही. मात्र, त्यातील एकाचे वय ४३ वर्षे असून तो वडगाव (यवतमाळ) येथील अशोकनगरातील रहिवासी आहे. तर, दुसऱ्याचे वय ४९ वर्षे असून तो लक्ष्मीपूर पोस्ट नवागड, जि. मुंगेर (बिहार) येथील रहिवासी असल्याचे समजते.

Web Title:  ATS has arrested two suspects in Nagpur