देशात भितीचे वातावरण : सुजात आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:11 IST2019-09-14T22:09:07+5:302019-09-14T22:11:04+5:30

देशात भीतीचे वातावरण आहे. लोकांनी काय बोलावे, काय लिहावे, काय खावे इतकेच नव्हे तर काय वाचावे हे सुद्धा सरकार ठरवत आहे. एकूणच देशात अघोषित आणीबाणी आहे, असे मत वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केले.

The atmosphere of fear in the country: Sujat Ambedkar | देशात भितीचे वातावरण : सुजात आंबेडकर

देशात भितीचे वातावरण : सुजात आंबेडकर

ठळक मुद्देसत्ता संपादन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात भीतीचे वातावरण आहे. लोकांनी काय बोलावे, काय लिहावे, काय खावे इतकेच नव्हे तर काय वाचावे हे सुद्धा सरकार ठरवत आहे. एकूणच देशात अघोषित आणीबाणी आहे, असे मत वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केले.
वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजू लोखंडे, सागर डबरासे, नितेश जंगले, संजय हेडाऊ, विशाल गोंडाणे, अ‍ॅड. विलास राऊत उपस्थित होते.
सुजात आंबेडकर म्हणाले, भाजप सत्तेत आल्यापासून ओबीसी, एससी. एसटी, मुस्लीमांवरील अत्याचावर वाढले आहेत. मागास विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती संपविण्यात येत आहे. मुले शिकूच नये, याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक शहर अध्यक्ष रवी शेंडे यांनी केले.

Web Title: The atmosphere of fear in the country: Sujat Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.