शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

इटलीतील ‘आयसीटीपी’च्या संचालकपदी अतिश दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:05 IST

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांची इटलीतील ‘आयसीटीपी’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटीकल फिजिक्स) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ५६ वर्षीय दाभोलकर हे ‘युनेस्को’चे सहायक महासंचालक या श्रेणीने नोव्हेंबरपासून या पदाची पाच वर्षांसाठी धुरा सांभाळणार आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या सुपुत्राचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानभारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून जागतिक ओळख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांची इटलीतील ‘आयसीटीपी’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटीकल फिजिक्स) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ५६ वर्षीय दाभोलकर हे ‘युनेस्को’चे सहायक महासंचालक या श्रेणीने नोव्हेंबरपासून या पदाची पाच वर्षांसाठी धुरा सांभाळणार आहेत.डॉ.दाभोलकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य झोकून देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे काका होते व वडील श्रीपाद दाभोलकर यांनीदेखील ‘प्रयोग परिवार’च्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले आहे. ‘स्ट्रींग थिअरी’, ‘ब्लॅक होल्स’ आणि ‘क्वॉन्टम् ग्र्रॅव्हिटी’ या विषयांवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणून डॉ.अतिश दाभोलकर यांची ख्याती आहे. हार्वर्ड विद्यापीठ आणि ‘कॅलटेक’ येथे संशोधनकार्य केल्यानंतर ते १९९६ साली भारतात परतले. २०१० पर्यंत ते मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ येथे सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यानंतर फ्रान्समध्ये सोरबोन विद्यापीठ आणि ‘सीएनआरएस’मध्ये (नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च) ते २००७ पासून संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत.‘आयसीटीपी’सारख्या विश्वविख्यात संस्थेचे निर्देशन करण्याची संधी हा एक मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे. बदलते वास्तव आणि विज्ञानाच्या नव्या दिशा ध्यानात घेऊन हे मिशन पुढे नेण्यासाठी योग्य त्या ‘व्हिजन’ची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे हे माझ्यासमोरील आव्हान असेल, असे मत अतिश दाभोलकर यांनी व्यक्त केले.काय आहे ‘आयसीटीपी’ ?नोबेल पुरस्कार विजेते अब्दुस सलाम यांनी १९६४ मध्ये ‘आयसीटीपी’ची स्थापना केली. मूलभूत संशोधनाबरोबर जगभर वैज्ञानिक क्षमता विकसित करण्याच्या प्रयत्नांमागील ‘आयसीटीपी’ ही एक प्रेरक शक्ती आहे. दरवर्षी जगभरातील ६००० हून अधिक वैज्ञानिक वेगवेगळ्या पातळीवरील वैज्ञानिक संशोधनासाठी तेथे भेट देतात. ‘आयसीटीपी’च्या कार्यकलापांचा लाभ घेणाऱ्या १८० देशांपैकी एक देश भारत आहे. इटालियन सरकार, आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा संस्था (आयएईए), आणि ‘युनेस्को’ यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार कार्यरत असणारी ‘आयसीटीपी’ ही युनेस्कोची प्रथम श्रेणीची संस्था आहे हे विशेष.भटनागर पुरस्काराने सन्मानित शास्त्रज्ञ‘क्वाँटम’ कृष्णविवरांच्या ‘एंट्रोपी’वरील मूलगामी अभ्यासाबद्दल २००६ साली भारतीय विज्ञानातील सर्वात प्रतिष्ठेचा शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. ते भारतीय विज्ञान अकादमीचेदेखील सदस्य आहेत. शिवाय २००७ मध्ये 'यंग लीडर इन सायन्स' म्हणून ‘आयआयएम नॅशनल लीडरशिप अवॉर्ड’ने त्यांना सन्मानित करण्यात आले. २००७ मध्येच त्यांना फ्रान्समधील नॅशनल रिसर्च एजन्सीकडून चेअर ऑफ एक्सलन्स' हे पाच लाख डॉलरचे प्रतिष्ठेचे अध्यासन प्राप्त झाले. हा सन्मान प्राप्त करणारे ते देशातील पहिलेच शास्त्रज्ञ ठरले आहेत.चक्क हॉकिंग आले होते भेटायलाजागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ.स्टीफन हॉकिंग हेदेखील डॉ.अतिश दाभोलकर यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. १९९५ साली डॉ.दाभोलकर यांनी ‘स्ट्रींग थिअरी’वर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी हॉकिंग यांनी कॅलिफोर्नियात चक्क ‘व्हीलचेअर’वरुन दाभोलकर यांच्या कार्यालयात येऊन त्यांची भेट घेतली होती. डॉ. दाभोलकर यांच्या प्रयत्नांतून डॉ. स्टीफन हॉकिंग २००१ साली मुंबईत झालेल्या ‘स्ट्रींग’ला उपस्थित झाले होते. यावेळी त्यांचे सायन येथील षण्मुखानंद सभागृहात व्याख्यानदेखील झाले होते.

टॅग्स :scienceविज्ञानnagpurनागपूर