लोकसभेसाठी काँग्रेसने नेमले विधानसभानिहाय निरीक्षक
By कमलेश वानखेडे | Updated: February 23, 2024 19:34 IST2024-02-23T19:33:56+5:302024-02-23T19:34:14+5:30
कोटेचा, धवड, कंभाले, वाघधरे आदींवर जबाबजारी

लोकसभेसाठी काँग्रेसने नेमले विधानसभानिहाय निरीक्षक
नागपूर : लोकसभा निवडणुकीतील प्रचार, प्रसाराचे नियोजन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, तयारीचा आढावा घेणे यासाठी काँग्रेसने विधानसभानिहाय निरीक्षक नियुक्त केले आहेत. राज्यातील २५२ विधानसभा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची यादी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली.
काँग्रेसच्या उद्योग व व्यापारी आघाडी सेलचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा यांच्याकडे मध्य नागपूर तर महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष तक्षशिला वाघधरे यांच्याकडे हिंगणा मतदारसंघाते निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. यासोबतच गज्जू यादव (काटोल), सचिन किरपान (सावनेर), अनिल आदमने (उमरेड), बाबा आष्टनकर (कामठी), नाना कंभाले (रामटेक), प्रा. दिनेश बानाबाकोडे (दक्षिण-पश्चिम नागपूर), राहुल घरडे (दक्षिण नागपूर), डॉ. राजू देवघरे (पूर्व नागपूर), प्रशांत धवड (पश्चिम नागपूर), ओवेस कादरी यांच्यावर उत्तर नागपूरची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे यांनी कळविले आहे.