शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा हिवाळी अधिवेशन; व्हीआयपी मोमेंटसोबतच मोर्चेकऱ्यांचीही गर्दी वाढली, रेल्वेस्थानकावर तगडा बंदोबस्त 

By नरेश डोंगरे | Updated: December 18, 2022 22:07 IST

स्थानिक तसेच बाहेरचे रेल्वे पोलीस तैनात, अकोल्याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रयत्न...

नरेश डोंगरे -नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने महत्वाचे, अतिमहत्वाचे व्यक्ती (आमदार, मंत्री) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची येथील रेल्वेस्थानकावर वर्दळ वाढली आहे. मोर्चेकरीही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूरच्या मुख्य तसेच अजनी रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.

तब्बल तीन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. सोमवारपासून या अधिवेशनाला प्रारंभ होत असला तरी अनेक मंत्री, आमदार रविवारीच नागपुरात दाखल झाले आहेत. विविध विभागाचे अधिकारी आणि नेत्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येत नागपुरात पोहचणे सुरू आहे. मुंबई, पुण्यांकडील अनेक व्हीआयपी, व्हीव्हीआयपी विमानाने आणि आलिशान खासगी वाहनाने येथे येत असले तरी खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक व्हीआयपी मात्र आपापल्या कार्यकर्त्यांसह रेल्वेनेच नागपुरात दाखल होत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर व्हीआयपी मोमेंट वाढली आहे. ती पुढचे दोन आठवडे वाढतच जाणार आहे. 

अशात आपल्या न्याय मागण्या सरकार दरबारी रेटण्यासाठी विविध संघटनांचे मोर्चेही सोमवारपासून अधिवेशनावर धडकणार आहेत. त्यामुळे संबंधित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते (मोर्चेकरी) मोठ्या संख्येत नागपुरात येणे सुरू झाले आहे. अशात येताना किंवा जाताना मोर्चेकरी अन् व्हीआयपी समोरासमोर आल्यास घोषणाबाजी, शाईफेकीसारखी कोणती अनुचित घटना घडू शकते. तसे होऊ नये म्हणून रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ठाकरे आणि शिवसेना गटाचे दोन नेते एकाचवेळी अकोला रेल्वेस्थानकावर आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती नागपुरात होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जात आहे.

प्रत्येक मोमेंटवर राहणार लक्ष -रेल्वेने जाणारे - येणारे व्हीआयपी, व्हीव्हीआयपी तसेच मोर्चेकरी एकाच वेळी स्थानकावर येऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक व्हीआयपीच्या मोमेंटवर लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वेस्थानकावर येण्यापासून तो रेल्वेेत बसण्यापर्यंत आणि बाहेरगावून रेल्वेस्थानकावर उतरण्यापासून तो येथून ते सुरक्षीत बाहेर जाण्यापर्यंतच्या घडामोडीचे पूर्वनियोजन केले जाणार आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनrailwayरेल्वेagitationआंदोलनPoliceपोलिस