नागपूर :कांबळे चौक कहा है? विचारले अन् १९ हजाराचा मोबाईल घेऊन पळाले

By दयानंद पाईकराव | Updated: December 30, 2023 17:15 IST2023-12-30T17:14:55+5:302023-12-30T17:15:05+5:30

आरोपींना २४ तासात अटक : अजनी पोलिसांची कामगिरी

asked address and ran away with mobile phone worth 19 thousand nagpur | नागपूर :कांबळे चौक कहा है? विचारले अन् १९ हजाराचा मोबाईल घेऊन पळाले

नागपूर :कांबळे चौक कहा है? विचारले अन् १९ हजाराचा मोबाईल घेऊन पळाले

नागपूर : कांबळे चौक कहा है ? अशी विचारणा करून दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी गुरुवारी २८ डिसेंबरला रात्री १० वाजता एका व्यक्तीजवळील १९ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पळ काढला. परंतु अजनी पोलिसांनी आरोपींना २४ तासात गजाआड केले.

विशाल राजू लोखंडे (वय ३० रा. कुकडे ले-आऊट ) व प्रमोद दामोदर बोंदाळे (वय ४७, रा. चंद्रमणीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २८ डिसेंबरला रात्री १० वाजताच्या सुमारास प्रकाश प्रमोद कळसकर (वय वय ३५ रा. अजनी रेल्वे क्वार्टर) हा कांबळे चौकातून पायी घरी जात होता. मोपेडवर आलेल्या दोन युवकांनी त्याला थांबविले. कांबळे चौक कहा है ? अशी विचारणा केली. त्यातील एका आरोपीने प्रकाशजवळील मोबाइल हिसकावला. त्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले.

प्रकाशने अजनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून मिळालेली माहिती व तांत्रिक तपास करून आरोपींना २४ तासात अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला मोबाईल जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर, हवालदार बंडू कळंबे , अंमलदार अविनाश ठाकूर, परवेज खान, मुरलीधर केवटी, रोशन नाडे केली.

Web Title: asked address and ran away with mobile phone worth 19 thousand nagpur