आश्विन सेठी समूह व सेठी समूह ६५० कोटींची गुंतवणूक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:02+5:302020-12-04T04:25:02+5:30
नागपूर : व्हिव्हियाना मॉलचा नागपुरात विस्तार करताना ////////////////////////////////////रिएलेटर्स आश्विन सेठी समूह नागपुरातील सेठी समूहासोबत ६५० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे ...

आश्विन सेठी समूह व सेठी समूह ६५० कोटींची गुंतवणूक करणार
नागपूर : व्हिव्हियाना मॉलचा नागपुरात विस्तार करताना ////////////////////////////////////रिएलेटर्स आश्विन सेठी समूह नागपुरातील सेठी समूहासोबत ६५० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे आश्विन सेठी समूहाने गुरुवारी म्हटले आहे.
प्रतापनगरजवळील एक दशलक्ष चौरस फूट व्हिव्हियाना मॉलच्या विकासासाठी दोन्ही समूहांनी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली असून, एका महिन्यात औपचारिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील. या बांधकामासाठी अर्थसाहाय्य किंवा कालमर्यादा कशी राहील, यावर विस्तृत माहिती दिली नाही; पण मॉल नागपुरातील सर्वात मोठा राहील आणि रामदासपेठ, धरमपेठ, धंतोली, प्रतापनगर, शिवाजीनगर आणि लक्ष्मीनगर यासारख्या समृद्ध शेजारच्या भागात असेल, असे निवेदनात म्हटले आहे.