शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

नागपुरातील नवोदय बँक घोटाळा : अशोक धवड यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:02 IST

पदाचा दुरुपयोग करून नवोदय बँकेत घोटाळा घडवून आणणारे बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक धवड यांना अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने मंगळवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे कारागृहातून अटक केली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेने घेतले कारागृहातून ताब्यात : बुधवारी मागणार पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पदाचा दुरुपयोग करून नवोदय बँकेत घोटाळा घडवून आणणारे बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक धवड यांना अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने मंगळवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे कारागृहातून अटक केली.नागपुरातील सुस्थितीतील बँक म्हणून १० वर्षांपूर्वी नवोदय बँक नावारूपाला होती. बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने ठगबाजांना पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिले. त्यांना लाखोंचे कर्ज देताना तारण म्हणून जी मालमत्ता ठेवली, त्याची शहानिशाही करण्यात आली नव्हती. काही कर्जदारांकडे आधीच थकबाकी होती, अशा डिफॉल्टर कर्जदारांनाही धवड आणि त्यांच्या साथीदारांनी पुन्हा लाखोंचे कर्ज दिले. ठगबाजांना कर्ज वाटणाऱ्या या टोळक्यात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही सहभागी होते. त्यांनी स्वत:साठीही लाखोंचे कर्ज घेतले आणि दुसरेच कर्जाची परतफेड करीत नसेल तर आपण कशाला फेडायचे, असे स्वत:च स्वत:ला सांगत सुस्थितीतील नवोदय बँकेला पुरते डबघाईला आणले. या बँकेत आपल्या आयुष्याची कमाई ठेवीच्या रूपात ठेवणाºया गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळेनाशी झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात तक्रारी, ओरड झाली आणि नंतर सहकार खात्यातर्फे बँकेच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली. त्यामुळे नवोदय बँकेचा घोटाळा उजेडात आला. या पार्श्वभूमीवर, १५ मे २०१९ रोजी धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बँकेला बुडविणारे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह अन्य आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने आरोपींची धरपकड सुरू केली. धवड यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. जामीन मिळण्याची शक्यता संपल्याने आणि न्यायालयाकडून दिलेली मुदत संपल्याने अखेर सोमवारी धवड न्यायालयाला शरण गेले. त्यांची न्यायालयीन कस्टडीत रवानगी करण्यात आली. मंगळवारी त्यांना प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले.धवड चौदावे आरोपीआतापर्यंत पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. त्यात कुख्यात, ठगबाज बिल्डर हेमंत झाम, मुकेश झामचाही समावेश आहे. धवड यांच्या अटकेमुळे हा आकडा आता १४ वर पोहचला आहे. बुधवारी न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी मिळवली जाणार आहे.

 

टॅग्स :Ashok Dhawadअशोक धवडArrestअटकbankबँकfraudधोकेबाजीnagpurनागपूर