शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पवारांचा हात असता तर पहाटेचे सरकार दोन दिवसात पडले नसते; अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर साधला नेम

By कमलेश वानखेडे | Updated: February 14, 2023 17:15 IST

फडणवीस पोटनिवडणूक पाहून बोलले, अशोक चव्हाण यांनी काढला चिमटा

नागपूर : पहाटेच्या शपथविधी (फडणवीस-अजित पवार सरकार) मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या संमतीने झाला असता तर ते सरकार दोन दिवसात पडले नसते. पूर्ण पाच वर्षे चालले असते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान चुकीचे आहे, असा सांगत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर नेम साधला.

डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी नागपुरात आले असता चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, फडणवीस यांच्या वक्तव्याची पाठराखण करताना ‘फडणवीस हे संघाच्या तालमीत तयार झाल्याने खोटे बोलत नाहीत’, असे बावनकुळे म्हणाले. फडणवीस हे हुशार आहेत, हे आपल्यालाही मान्य आहे. ते कधी, कुठे काय बोलायचं याचा विचार करून, वेळ काळ पाहूनच स्टेटमेंट करतात यात शंका नाही. आता कसबा व चिंचवडची पोटनिवडणूक सुरू असताना त्यांनी हे विधान आहे, असा चिमटा चव्हाण यांनी काढला.

‘समझोता’वरून चंद्रशेखर बावनकुळे-अनिल देशमुख आमनेसामने

पवार यांचे समर्थन असते तर सरकार दोन दिवसात पडले नसते. त्यावेळी ही सर्व प्रक्रिया मी जवळून पाहत होतो. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून परत बोलावले. ताकीद दिली. ही आपली भूमिका नाही, असे पटवून सांगितले. पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळेच राष्ट्रवादीचे आमदार परतले व पहाटेचे सरकार पडले, असेही चव्हाण म्हणाले. नागपूर विमानतळावर चव्हाण यांचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, अनंतराव घारड, रामकिशन ओझा, अतुल कोटेचा, अभिजित सपकाळ आदिंनी स्वागत केले.

वृत्तपत्र, माध्यमांची स्वायत्तता कायम रहावी

- सर्वे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. देशात सर्वत्र सर्वे, धाडी सुरू असतात. वृत्तपत्र, माध्यमांची स्वायत्तता कायम राहिली पाहिजे. देशाच्या लोकशाहीत हे अपेक्षित आहे, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस