आशिष देशमुख काँग्रेसच्या वाटेवर; चव्हाण यांच्याशी दिल्लीत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 11:09 IST2018-03-07T11:00:18+5:302018-03-07T11:09:11+5:30

भाजपवर नाराज असलेले काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे काँग्र्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेतली.

Ashish Deshmukh on the way to Congress; Visit to Chavan with Delhi | आशिष देशमुख काँग्रेसच्या वाटेवर; चव्हाण यांच्याशी दिल्लीत भेट

आशिष देशमुख काँग्रेसच्या वाटेवर; चव्हाण यांच्याशी दिल्लीत भेट

ठळक मुद्देरणजित देशमुखही उपस्थित होते

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपवर नाराज असलेले काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे काँग्र्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वडील माजी मंत्री रणजित देशमुख हेही उपस्थित होते. या बैठकीत आशिष यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांनी उघडपणे भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात ते काटोल येथे उपोषणालाही बसले होते. या नंतर सरकारकडून देशमुखांच्या संस्थांना नोटीसही बजावण्यात आल्या. देशमुख हे भाजपमध्ये अस्वस्थ असून ते सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेत आहे. मंगळवारी रात्री चव्हाण यांच्याशी झालेली भेट त्याच्याच एक भाग होती. मात्र या बैठकीत रणजित देशमुखही उपस्थित असल्यामुळे आता आशिष देशमुख काही तरी अंतिम निर्णय घेतील असे दिसते. दरम्यान नागपुरातील दिल्लीवारीवर असलेल्या काँग्रेस नेत्यांना याभेटीचे साक्षीदार होता आले. त्यामुळे ही गुप्त भेट उजेडात आली. याबाबत आशिष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते फोनवर उपलब्ध होऊ शकले नाही.

Web Title: Ashish Deshmukh on the way to Congress; Visit to Chavan with Delhi