आशीनगर झोनने ३६ अतिक्रमण काढले

By मंगेश व्यवहारे | Updated: May 20, 2023 16:26 IST2023-05-20T14:52:33+5:302023-05-20T16:26:57+5:30

फूटपाथवर लागलेले १० शेड तोडण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत बांगलादेश नाईक तलाव येथे कारवाई करण्यात आली.

Ashinagar zone removed 36 encroachments | आशीनगर झोनने ३६ अतिक्रमण काढले

आशीनगर झोनने ३६ अतिक्रमण काढले

नागपूर : आशी नगर झोन अंतर्गत ३६ अतिक्रमण काढण्यात आले असून १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. कमाल चौक ते इंदोरा चौक ते चार खंबा चौक ते वैशाली नगर ते राणी दुर्गावती चौक ते ऑटो मोटीव चौक ते कमाल चौक ते इंदोरा चौकपर्यंत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.

फूटपाथवर लागलेले १० शेड तोडण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत बांगलादेश नाईक तलाव येथे कारवाई करण्यात आली. तलावाच्या परिसरातील अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मनिषनगर येथे कारवाई करण्यात आली. नरेंद्रनगर फायर ऑफिस येथे फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले टायरवाल्यांची दुकान हटविण्यात आली.

Web Title: Ashinagar zone removed 36 encroachments

टॅग्स :nagpurनागपूर