शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळात सेवा बजावणाऱ्या आशा, अंगणवाडीसेविका वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. आरोग्यसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर ...

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. आरोग्यसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर आणि अंगणवाडीसेविकाच प्रशासनाच्या लेखी वाऱ्यावर आहेत. त्यांना सॅनिटायझर किट द्यावी, तसेच त्यांचा ५० लाख रुपयांचा विमा सरकारने उतरवावा, अशी मागणी आयटकने केली आहे.

नागपूर जिल्ह्यात संसर्ग वाढत असून, मृताच्या संख्येतही वाढ होत आहे. अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेवक, आरोग्यसेवक जिवाची पर्वा न करता, ग्रामीण भागात झुंज देत आहेत. जनप्रतिनिधी, जिल्हाधिकारी बैठका घेऊन देत असलेल्या आदेशाचे पालन हे कर्मचारी करीत आहे. या कर्मचाऱ्यांना पी.पी.ई. किट, सॅनिटायझर, औषध किट देण्याची गरज असूनही ती मिळत नाही. एका ऑक्सिमीटरवर दहा आशा कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.

सेवारत असताना कोरोना योद्धा दगावल्यास ५० लाख रुपयांची विमा रक्कम त्यांच्या परिवाराला देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही आशा, अंगणवाडी कार्यकर्तीच्या कुटुंबीयांना मदत मिळालेली नाही. यामुळे जिवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची मने विचलित होण्याची शक्यता आहे. ही मदत न मिळाल्यास संचारबंदीचे नियम तोडून आंदोलन उभारण्याचा इशारा इशारा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या कामगार संघटनेने दिला आहे.

...

‘त्यांच्या’ मृत्यूचा सन्मान करा

राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोप-प्रत्यारोपात जनता भरडत आहे. राजकीय पक्ष कोरोना योद्धांना प्रमाणपत्रे वाटण्याचे कार्यक्रम करून धन्यता मानत आहे. बेगम नसीम पठाण (रामटेक), लक्ष्मी ऊके आणि विना तांबे (कामठी), माला बोरकर (कळमेश्वर) या आरोग्यसेविका व भरतवाड्याच्या आशा कर्मचारी सविता कुकडे यांचा सेवाकाळात मृत्यू होऊनही कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली नाही, तरीही हे कर्मचारी सेवा देतच आहेत. त्यांच्या सेवेचा सरकार व प्रशासनाने सन्मान करावा, अशी मागणी आयटकने केली आहे.

...