शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळीला पॅरॉल नाकारला

By admin | Updated: April 25, 2015 02:18 IST

कुख्यात डॉन अरुण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला मुलाच्या लग्नासाठी सुट्या मिळाव्यात, यासाठी त्याने अर्ज केला होता. मात्र अरुण गवळीच्या पॅरॉल अर्जावर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आक्षेप घेतल्याने, त्याचा अर्ज विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावला. अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसांदेकर यांच्या खूनप्रकरणात २०१२ साली मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. तेव्हा शिक्षा भोगण्यासाठी त्याला नागपूर कारागृहात हलविण्यात आले. गवळीविरुद्ध मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. या प्रकरणांच्या सुनावणीसाठी त्याला मुंबईला रिंमांडवर नेण्यात आले होते.दरम्यान तो तळोजा कारागृहात होता. १६ मार्च रोजी त्याला नागपूर कारागृहात आणण्यात आले. येथे येताच त्याने मुलाच्या लग्नाचे कारण सांगून पॅरॉलसाठी अर्ज केला. (प्रतिनिधी)‘डॅडी’ची सून नागपूरचीअरुण गवळी ऊर्फ ‘डॅडी’ची सून ही नागपुरातीलच आहे. सध्या ती एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी एका सामूहिक विवाह सोहळ््यात गवळीचा मुलगा महेश व या मुलीची ओळख झाली होती. त्यानंतर नागपूर कारागृहातच गवळीने लग्नाला होकार दिला अशी माहिती सूत्रांनी दिली.गवळी कोणत्या खात्याचे मंत्री ?अरुण गवळीच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर अरुण गवळी यांच्या नावाखाली आमदार आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री असा उल्लेख आहे. त्यामुळे गवळी हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गवळी हे सध्या विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, हे येथे उल्लेखनीय.