शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लाल मिरचीच्या २५ हजार पोत्यांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या सोमवारी कळमना बाजारात लाल मिरचीच्या २५ हजार पोत्यांची आवक झाली आहे. मिरचीची खेप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या सोमवारी कळमना बाजारात लाल मिरचीच्या २५ हजार पोत्यांची आवक झाली आहे. मिरचीची खेप आणखीन उतरणार असल्याने मिरचीचे भावही घसरणार असल्याचे भाकीत व्यापारी वर्तवत आहेत. त्याच अनुषंगाने आतापासूनच व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या भिवापुरी लाल मिरची बाजारात उतरायला लागली आहे. यासोबतच अन्य उत्पादक क्षेत्रातूनही लाल मिरचीचे आगमन मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना येथील मिरची बाजारात व्हायला लागले आहे. सद्यस्थितीत ही आवक सामान्य मानली जात असून, डोमेस्टिक, एक्सपोर्टर्स व स्टॉकिस्टकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने लाल मिरचीचे दर ५-७ रुपयांनी वाढले आहेत. मात्र, १५ मार्चनंतर लाल मिरचीची आवक वाढल्यावर हे दर कमी होतील, असे भाकीत ठोक व्यापाऱ्यांकडून मिळत आहे. कळमना येथे प्रत्येक सोमवारी शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी केली जाते. त्याच अनुषंगाने सोमवारी कळमना येथे २५ हजार बोरे लाल मिरचीचे उतरले. यात भिवापूरसह अन्य स्थानिक शेतकऱ्यांचे ७ हजार बोरे, चिखली-बुलडाणा-राजूरा आदी महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांवरून ७ हजार आणि आंध्र प्रदेश येथील गुंटूर, खम्ममचे १० ते १२ हजार लाल मिरचीच्या बोऱ्यांचा समावेश असल्याचे कळमना मिरची बाजारातील ठोक व्यापारी संजय वाधवानी यांनी सांगितले. यंदा लाल मिरचीचे उत्पादन उत्तम झाल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात आवक वाढणार असल्याचेही ते म्हणाले.

सद्यस्थितीत १२० ते १६० रुपये किलो

भिवापूर, मांढळ येथील रोशनी लाल मिरची होलसेलमध्ये १२० ते १४० रुपये, राजूरा येथील डीडीफाय लाल मिरची १३० ते १६० रुपये, एण्डाफाय लाल मिरची १३० ते १५० रुपये, खम्मम/गुंटूरची तेजा मिरची १४० ते १५५ रुपये, ३३४ ग्रेडची लाल मिरची १२० ते १२५ रुपये किलो दराने सद्यस्थितीत विकली जात आहे. हे दर येत्या काळात आवक वाढल्यावर घसरण्याची शक्यता आहे.

ओरिजिनल भिवापुरी मिरची महाग

ओरिजिनल भिवापुरी लाल मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने, ही मिरची २०० रुपये किलो दराने विकली जात असल्याचे मिरची उत्पादक शेतकरी नारायण चौधरी यांनी सांगितले. भिवापुरी हायब्रिडचे दरही २०० रुपये किलो सुरू आहे. कमी उत्पादन क्षमता असल्याने शेतकरी ओरिजिनल भिवापुरीऐवजी हायब्रिड लाल मिरचीचे पीक घेण्यावर भर देत आहेत. विशेष म्हणजे हिरवी भिवापुरी मिरची प्रारंभिक अवस्थेतच तोडून देशाच्या अन्य भागात विकली जात असल्याने, ओरिजिनल भिवापुरी मिरचीचा तुटवडा निर्माण झाला आहे. ओरिजिनलला जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) मिळाल्यावरही कृषी विद्यापीठाकडून या मिरचीचे उत्पादन वाढविण्याच्या अनुषंगाने अनुसंधान केले जात नसल्याने शेतकरी हायब्रिडकडे आकर्षित होत असल्याचे नारायण चौधरी म्हणाले.

.........