शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

नागपुरात ऑनलाइन जुगार अड्डा चालविणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 7:50 PM

मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस ग्रुपच्या नावाखाली मोबाईलमध्ये जुगाऱ्यांचा ग्रुप तयार करून त्यांना ऑनलाईन जुगार उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीला कपिलनगर पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देमोठी यादी, मोबाईल जप्त : कपिलनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस ग्रुपच्या नावाखाली मोबाईलमध्ये जुगाऱ्यांचा ग्रुप तयार करून त्यांना ऑनलाईन जुगार उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीला कपिलनगर पोलिसांनी अटक केली.त्याच्या मोबाईलमध्ये शहरातील विविध भागात राहणाऱ्या अनेक जुगाऱ्यांची मोठी यादी असल्याचे समजते.गुरुप्रीतसिंग अमरजीतसिंग मथारू (वय ३१) असे आरोपीचे नाव असून, तो शेंडेनगर टेकानाका परिसरात राहतो.आरोपी गुरुप्रीतसिंग याने ऑनलाईन जुगार अड्डा चालविण्याचा अफलातून प्रायोग चालविला आहे. त्याने आपल्या मोबाईलमध्ये जुगाºयांच्या नावाने एक व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसच्या नावाखाली लुडो प्ले अ‍ॅण्ड विन नावाचा ग्रुप तयार केला आहे. हे सर्व जुगारी लुडो गेम खेळून त्यावर पैशाची हारजीत करीत असतात. ज्यांना हा जुगार खेळायचा त्यांच्याकडून आधीच गुरुप्रीतसिंग गुगल पे, फोन पे, पेटीएमद्वारे रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करून घेतो. तो नंतर पैसे जमा करणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या जुगाऱ्याचा मोबाईल नंबर आणि ऑनलाइन लुडो गेमचा कोड पाठवतो. या दोघातील जो कोणी रक्कम जिंकला तो जुगारी आरोपी गुरुप्रीतसिंग याला आपल्या मोबाईलचा स्क्रीन शॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवत होता. त्यानंतर आरोपी त्याची रक्कम तसेच त्याने जिंकलेल्या रकमेवरचे १० टक्के कमिशन कापून उर्वरित रक्कम जुगार जिंकणाऱ्या जुगाऱ्याला मोबाईलच्या माध्यमातून परत पाठवीत होता. अशाप्रकारे ऑनलाइन लुडो खेळण्याकरिता त्याच्या ग्रुपमध्ये अनेक मेंबर तयार असायचे. गुरुप्रीतसिंग या माध्यमातून रोज लाखो रुपयांची हार-जीत करीत असल्याची माहिती कपिलनगर पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार प्रभाकर मते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप राहटे, भारत जाधव, रूपाली साळुंके, हवालदार गणेश बर्डे, नायक आसिफ, शिपाई प्रवीण मरापे, विजय वायदुडे, राहुल नागदेवते यांनी आरोपी गुरुप्रीतसिंगच्या घरी गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास छापा घातला. त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असता त्यात अनेकजण ऑनलाईन लुडो जुगार खेळत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला. त्याने दहा टक्के कमिशनवर आपण ऑनलाईन जुगार चालवीत असल्याचे मान्य केले. त्यामुळे त्याला जुगार कायद्यानुसार पोलिसांनी अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या अनेकांची नावे सापडली आहेत.अफलातून शक्कल, प्रशंसनीय कारवाईअशाप्रकारे जुगार अड्डा चालवून रोज लाखोंची हार-जीत करण्याची अफलातून शक्कल गुरुप्रीतसिंगने लढवली होती. त्याची कुणाला माहिती मिळणार नाही, असा आरोपीचा होरा होता; मात्र कपिलनगर पोलिसांनी त्याच्या गोरखधंद्याचा छडा लावून ही प्रशंसनीय कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइन