शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : वसंतराव गाेविंदराव पुसदकर (५१, रा. सावंगी, ता. कळमेश्वर) यांच्या खून प्रकरणात पसार असलेल्या आराेपीस ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : वसंतराव गाेविंदराव पुसदकर (५१, रा. सावंगी, ता. कळमेश्वर) यांच्या खून प्रकरणात पसार असलेल्या आराेपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या १५ दिवसानंतर अटक केली. त्याला पिथमपूर, जिल्हा धार (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.

रायसिंग भागेरथ मेवाडा (४२, रा. सावंगी, ता. कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. वसंतराव पुसदकर हे गुमथळा (ता. कळमेश्वर) शिवारातील शेतात गेले हाेते. घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पाेलिसात दाखल केली हाेती. त्यातच २० जानेवारी २०२१ राेजी त्यांचा मृतदेह अरुण सावरकर यांच्या शेतालगतच्या नालीत आढळून आला. त्यांच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमांमुळे त्यांचा शस्त्राने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले हाेते. त्यामुळे पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला हाेता.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही समांतर तपासाला सुरुवात केली. ताे पिथमपूर येथे असल्याचे कळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिथमपूर गाठून त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे व जावेद शेख, राजेंद्र सनाेडिया, जयप्रकाश शर्मा, राेहन डाखाेरे, अमृत किनगे, अजिज दुधकनाेज, कविता बचले, सायबर सेलचे सतीश राठाेड यांच्या पथकाने केली.

...

खाेट्या नावाने वास्तव्य

वसंतराव यांचा खून केल्यानंतर रायसिंग पळून गेला हाेता. ताे पिथमपूर येथे खाेट्या नावाने राहात हाेता. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला असंबद्ध उत्तरे दिली. त्यानंतर मात्र त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय, त्याने हा खून अनैतिक संबंंधातून केल्याचेही पाेलिसांना सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुढील चाैकशीसाठी कळमेश्वर पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे.