Nagpur: गळ्याला कोयता लाऊन पैसे, दागिने मागणाऱ्या इंगाला अटक, वस्तीतील गुन्हेगाराचे कृत्य
By दयानंद पाईकराव | Updated: October 31, 2023 18:48 IST2023-10-31T18:45:33+5:302023-10-31T18:48:24+5:30
Nagpur Crime News: गळ्याला कोयता लाऊन पैसे आणि अंगावरील सोन्याचे दागिने मागणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान प्रसंगावधान ठेऊन फिर्यादीने तेथून पळ काढल्यामुळे अनर्थ टळला.

Nagpur: गळ्याला कोयता लाऊन पैसे, दागिने मागणाऱ्या इंगाला अटक, वस्तीतील गुन्हेगाराचे कृत्य
- दयानंद पाईकराव
नागपूर - गळ्याला कोयता लाऊन पैसे आणि अंगावरील सोन्याचे दागीने मागणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान प्रसंगावधान ठेऊन फिर्यादीने तेथून पळ काढल्यामुळे अनर्थ टळला.
कुशल उर्फ इंगा दत्तात्रय शेंडे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या वस्तीत करण अपार्टमेंट नवापुरा मस्जिदजवळ फिर्यादी विजयसिंग इंद्रपालसिंग दीक्षित (वय ५९) हे राहतात. विजयसिंग रात्री जेवन केल्यानंतर घरासमोर उभे होते. तेवढ्यात आरोपी इंगा त्यांच्याजवळ आला. इंगाने इंद्रपालसिंग यांच्या गळ्याला कोयता लाऊन पैसे व अंगावरील सोन्याचे दागीने काढून दे नाहीतर तुला जिवानिशी ठार मारील, अशी धमकी दिली. हाताच्या बोटातील अंगठी काढण्याचा हावभाव करून इंद्रपालसिंग यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी इंगाविरुद्ध कलम ३९८, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.