शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरती प्रक्रिया आता आॅनलाईन

By admin | Updated: July 9, 2015 02:52 IST

भारतीय सैन्य दलात भरती संचालनालयाने दिल्ली मुख्यालयात भरतीसाठी आॅनलाईन नोंदणी करता यावी यासाठी ...

नागपूर : भारतीय सैन्य दलात भरती संचालनालयाने दिल्ली मुख्यालयात भरतीसाठी आॅनलाईन नोंदणी करता यावी यासाठी वेबसाईट सुरू केली असून वेबसाईटवरील नोंदणीनुसार उमेदवारांना शारीरिक आणि इतर तपासण्यासाठी बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती आर्मी रिक्रूटमेंट आॅफिसचे संचालक कर्नल एम. के. जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना दिलेल्या तारखेच्या आधारे डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉटजॉईन इंडियनआर्मीडॉटएनआयसीडॉटइन या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी लागणार आहे. भरतीची तारीख वेबसाईटवर टाकण्यात येईल. त्याबाबतची सूचना वृत्तपत्र, स्थानिक दूरचित्रवाहिन्या, जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे देण्यात येईल. आॅनलाईन नोंदणी भरतीच्या ४५ दिवसांपूर्वी सुरू करण्यात येईल. उमेदवार भरतीच्या वेबसाईटवर सायबर कॅफे, सामान्य सुविधा केंद्रातून नोंदणी करता येईल. आॅनलाईन नोंदणीसाठी उमेदवाराला आपल्या सोबत शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, स्वत:ची माहिती, निवासाचे प्रमाणपत्र, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे आणावी लागतील. उमेदवाराची आॅनलाईन नोंदणी यशस्वी झाल्यानंतर उमेदवाराला प्रवेशपत्र देण्यात येईल. नागपूर सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने जानेवारी २०१६ मध्ये सेना भरती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. विदर्भातील बुलडाणा जिल्हा वगळून सर्व जिल्ह्यातील उमेदवार भरती सुरू होण्याच्या ४५ दिवसांपूर्वी नोंदणी करू शकतील. उमेदवारांना आॅनलाईन नोंदणीत मदत हवी असल्यास सैन्य भरती कार्यालयात मदत मिळू शकणार असल्याचे कर्नल एम. के. जोशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सैन्य भरती कार्यालयाचे अश्वनी पांडे, विंग कमांडर तथा जनसंपर्क अधिकारी समीर गंगाखेडकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)