विधानभवनात बचत गटाच्या महिलांमध्ये वादावादी; शेजारी स्टॉल सुरु केल्याने पेटला वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 22:30 IST2025-12-11T22:26:15+5:302025-12-11T22:30:56+5:30
या गोंधळामुळे अधिवेशनाची प्रतिमा डागाळल्याचीही चर्चा रंगली.

विधानभवनात बचत गटाच्या महिलांमध्ये वादावादी; शेजारी स्टॉल सुरु केल्याने पेटला वाद
नागपूर : विधिमंडळ परिसरात बचत गटांच्या स्टॉल वितरणादरम्यान गुरुवारी चांगलाच गोंधळ उडाला. दोन दिवसांपासून रिकामा ठेवलेल्या एका स्टॉलने अचानक सायंकाळी ‘भजे’ तळायला सुरुवात केली. शेजारील स्टॉलवर ग्राहकांची वाढती गर्दी पाहून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. यावरून ग्राहक ओढण्याच्या आरोपांमुळे दोन्ही बचत गटांच्या महिलांमध्ये वादावादी झाली.
घटनेच्या वेळी अधिकारी व अभ्यागत उपस्थित असल्याने वातावरण अधिकच तापले. उट्टे-उट्ट्यांनी भरलेला हा वाद पाहून परिसराच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
गेल्या दोन वर्षांपासून स्टॉल वाटपात जुन्या गटांना डावलले जात असल्याची नाराजी व्यक्त होत असून, नवीन गटांना विधिमंडळाच्या शिस्तीची जाण नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप अभ्यागतांनी केला. या गोंधळामुळे अधिवेशनाची प्रतिमा डागाळल्याचीही चर्चा रंगली.