शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती आलीच तर सक्षम आहोत का?

By admin | Updated: April 27, 2015 02:19 IST

उपराजधानी भूकंपाच्या बाबतीत सुरक्षित असल्याचे मानले जाते. परंतु शनिवार व रविवारी नागपुरातही ...

नागपूर : उपराजधानी भूकंपाच्या बाबतीत सुरक्षित असल्याचे मानले जाते. परंतु शनिवार व रविवारी नागपुरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दुर्दैवाने असे नैसर्गिक संकट आलेच तर त्याचा सामना करण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. म्हणायला महापालिकेचा अग्निशमन विभाग आहे. परंतु तोही अशा संकटापुढे हतबल ठरणार असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सध्यातरी असे संकट आलेच तर परमेश्वराशिवाय दुसरा कोणीही आपला तारणहार नाही.देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहरात भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भूकंपासारखी आपत्ती आल्यास त्याचा सामना करणारी सक्षम यंत्रणा नाही. नागपूर शहर व परिसरात पूर, आग व नदी-नाल्यात बुडण्याच्या घटना घडतात. अशा संकट प्रसंगी तातडीने मदत करता येईल अशी यंत्रणा अग्निशमन विभागाकडे आहे. परंतु भूकंपासारखी आपत्ती आल्यास सामना करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याची जाणीव मनपा प्रशासनाला आहे. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनीही याला दुजोरा दिला आहे.शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही लोकांनी अग्निशमन विभागाला याची सूचना दिली. विभागाचे वाहन पोहचले. परंतु घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्याशिवाय दुसरी कोणतेही उपाय त्यांच्याकडे नव्हते.नागपुरात अग्निशमन विभागाचे राष्ट्रीय स्तरावरील कॉलेज आहे. देशभरातील प्रशिक्षणार्थी येथे प्रशिक्षणासाठी येतात. परंतु भूकंपासारखी आपत्ती आल्यास अशा संकटाचा सामना करता यावा, या दृष्टीने अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा अद्याप विचार झालेला नाही. अशा संकटाचा सामना तर दूरच उंच इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आण्यासाठी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. काही वर्षापूर्वी महालगाव येथील एका कोल्ड स्टोअरेजला आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना तीन दिवस प्रयत्न करावे लागले होते. गे्रट नागरोडवरील लोखंडे यांच्या इमारतीत लागलेली आग आटोक्यात आणताना विभागाचा एक कर्मचारी शहीद झाला होता. यातून विभागाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. शहरात जुन्या इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळा आला की अशा इमारत मालकांना नोटीस बजावल्या जातात. परंतु पुढे कोणतीही कारवाई होत नाही. शहरात ठिक ठिकाणी पडलेली झाडे हटविण्याचे काम विभागाचे जवान करतात. (प्रतिनिधी)