काटोल : सध्या परिस्थीमध्ये जी रेशन दुकाने आहेत त्याचे गावाचे अंतर जास्त असल्याने गावातच नवीन रेशन दुकान होण्याची मागणी नागरिकांची होती. यावर तोडगा काढण्यात आला असून काटोल-नरखेड तालुक्यात ६३ नवीन रेशन दुकाने मंजुर करण्यात आली आहे. यातील २६ नरखेड तालुक्यात तर ३७ काटोल तालुक्यात असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना रेशन घेण्यासाठी स्वत:च्या गावातून बरेच लांब अंतर जावे जागत होते. यामुळे गावातच राशन दुकाने मिळण्यात यावी यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो मान्य करण्यात आला. दरम्यानच्या काळात या नवीन दुकानासंदर्भात जाहीरात सुध्दा प्रकाशीत करण्यात आली होती. परंतु याचा योग्य प्रचार न झाल्याने अर्ज आले नाही. या संर्दभात नुकतीच जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्यासोबत बैठक झाली. तीत नरखेड आणि काटोल तालुक्यातील नवीन रेशन दुकानाबाबत चर्चा करण्यात आली. महिला बचत गटांना हे नवीन दुकान देण्यासाठी प्राध्यान्य देण्यात येणार आहे.
काटोल-नरखेड मध्ये ६३ नवीन रेशन दुकानांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST