शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

तुकाराम मुंढेंविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:45 IST

महापौर संदीप जोशी व सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य वित्तीय अधिकारी मोना ठाकूर व लेखाधिकारी अमृता देशकर यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १५६(३)अंतर्गत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य वित्तीय अधिकारी मोना ठाकूर व लेखाधिकारी अमृता देशकर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६३, ४६४, ४६५, ४६८ व ४७१ आणि कंपनी कायद्यातील कलम ४४७ अन्वये एफआयआर नोंदविण्यात यावा, याकरिता महापौर संदीप जोशी व सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १५६(३)अंतर्गत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.या तीन अधिकाऱ्यांनी नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला, असा अर्जदारांचा आरोप आहे. यासंदर्भात संदीप जोशी यांनी २२ जून २०२० रोजी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु, त्यावरून या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला नाही. पोलीस उपायुक्तांनी ३ जुलै रोजी पत्र पाठवून एफआयआर नोंदविण्यास नकार दिला. परिणामी, न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता १ जुलै २०१६ रोजी स्थापन नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे बँक आॅफ महाराष्ट्रच्या महानगरपालिका शाखेत चालू खाते आहे. ३ जुलै २०१८ रोजी मोना ठाकूर व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनवणे यांनी बँकेला पत्र देऊन संचालक मंडळाच्या ठरावानुसार महानगरपालिका आयुक्त, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य वित्तीय अधिकारी यांच्यापैकी कोणतेही दोन अधिकारी बँक खाते संचालित करू शकतात, असे कळवले होते.

त्यानुसार ठाकूर व सोनवणे यांना बँक खाते संचालित करण्याची परवागनी देण्यात आली होती. परंतु, कंपनीच्या संचालक मंडळाने असा ठराव पारित केला नाही. या अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहाराकरिता बँकेला खोटी माहिती दिली, असे अर्जदारांचे म्हणणे आहे.सोनवणे यांनी ११ फेब्रुवारी २०२० रोजी राजीनामा दिल्यानंतर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनी अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या निर्देशाचा दाखला देऊ न मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करायला सुरुवात केली. यासंदर्भात जोशी यांनी परदेशी यांना ई-मेल पाठवून विचारणा केली असता, त्यांना काहीच उत्तर देण्यात आले नाही.मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे अधिकार संचालक मंडळाला आहेत आणि संचालक मंडळाने मुंढे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली नाही. तसेच, त्यांना नामनिर्देशित संचालकही करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना बँक खाते संचालित करण्याचा अधिकार नाही. असे असताना त्यांनी कंपनीचे २० कोटी रुपये अवैधपणे युनिफॅब इन्फ्रा, शापूर्जी पालनजी इत्यादी कंपन्यांकडे वळती केली. तसेच, शीतल ठेव योजनेतील १८ कोटी रुपये कंपनीच्या खात्यात टाकण्याचे निर्देश दिले. ही कृती अवैध असल्यामुळे संबंधित तिन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे सदर पोलिसांना निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण व अ‍ॅड. निखिल कीर्तने कामकाज पाहतील.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे