‘आपली बस’ चालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 21:50 IST2020-07-24T21:49:16+5:302020-07-24T21:50:37+5:30
घरगुती वाद आणि आर्थिक कोंडीला कंटाळून आपली बस चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

‘आपली बस’ चालकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती वाद आणि आर्थिक कोंडीला कंटाळून आपली बस चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. विशाल गुलाब हटवार (वय ३१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो आपली बसमध्ये चालक म्हणून नोकरीला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. विशालच्या घरात कुटुंब कलह सुरू होता. पत्नीने यासंबंधाने कळमना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. घरी नेहमी वाद सुरू होते. त्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडी झाल्याने त्याने गळफास लावून घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मनीषा विशाल हटवार यांनी दिलेल्या माहितीवरून पीएसआय मुकुंद जाधव यांनी कळमना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.