शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

२० दिवसांपासून अ‍ॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:13 PM

श्वान चावल्यानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अ‍ॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये गेल्या २० दिवसांपासून ही लस नाही. परिणामी, गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. पदरमोड करून त्यांना ही लस विकत घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्दे मेयो, मेडिकलमधील रुग्ण अडचणीत : पुरवठादारांकडून मोजकाच पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्वान चावल्यानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अ‍ॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये गेल्या २० दिवसांपासून ही लस नाही. परिणामी, गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. पदरमोड करून त्यांना ही लस विकत घ्यावी लागत आहे.श्वानदंशामुळे दरवर्षी साधारण २० हजार लोकांचा ‘रॅबिज’मुळे मृत्यू होतो. यात १५ वर्षे वयोगटाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. लस न टोचलेली कुत्री मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने होतो. विशेष म्हणजे, श्वान चावल्यानंतर देण्यात येणारी लसीची किंमत गरिबांना परवडणारी नाही. यातही केवळ बीपीएलच्या रुग्णांनाच ही लस उपलब्ध करून देण्याचे मेयो, मेडिकलचे अजब धोरण आहे. मेयो व मेडिकलमध्ये आठवडाभरात सुमारे ७० ते ८० वर अ‍ॅन्टीरेबिज लसीची गरज भासते. महिन्याची सरासरी काढली तर मेडिकलला दरमहा ५०० अ‍ॅन्टीरेबिज लसी लागतात. ही लस ‘इंडियन इम्युनॉलॉजिकल’कडूनच मिळते. मात्र मागणीच्या तुलनेत फार कमी साठा पुरवठादाराकडून मिळतो. सध्या तरी या दोन्ही रुग्णालयात ही लस नाही. यामुळे आता ‘बीपीएल’ रुग्णांसह सामान्य रुग्णही अडचणीत आले आहेत.‘हाफकिन’कडून लसीची प्रतीक्षावैद्यकीय शिक्षण विभागाच्या दरकरारावरील औषधे विकत घेण्याचा नियम होता. परंतु ३१ जानेवारीला या दरकराराची मुदतवाढ संपली, तर आता औषधे खरेदीची जबाबदारी ‘हाफकिन कॉर्पाेरेशन’कडे देण्यात आली आहे. परंतु या हाफकिनकडून अद्यापही अ‍ॅन्टीरेबिज लसीसह इतरही आवश्यक औषधे उपलब्ध झाली नाहीत. यामुळे दोन्ही रुग्णालयात औषधांना घेऊन विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.मनपाकडूनही रुग्णांची बोळवणशहरातील गल्लीबोळात कुत्र्यांचा त्रास कमी झालेला नाही. श्वान चावण्याच्या घटना वाढतच आहेत. मेयो, मेडिकलमध्ये ही लस नसल्याने रुग्णांना महापालिकेच्या इस्पितळांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे. मनपाच्या सदर आणि महाल येथील इस्पितळांमध्ये अ‍ॅन्टीरेबिजची लस उपलब्ध आहे. परंतु रविवार व इतर सुटींच्या दिवशी ही दोन्ही इस्पितळे बंद राहत असल्याने रुग्णांची बोळवण होते. इतर दिवशीही ठराविक वेळेतच ही लस मिळते. यामुळे गरिबांनी करावे काय, हा प्रश्न विचारल्या जात आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdogकुत्रा